---Advertisement---

जिद्द असावी अशी.. कठोर परिश्रम घेऊन सचिनची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी

By Chetan Patil

Published On:

police
---Advertisement---

MPSC Success Story आपण स्वप्ने नुसती रंगून चालत नाही तर परिस्थिती कोणतीही असली तरी त्यावर मात करत यश मिळवता आले पाहिजे.टाकवे बुद्रुकचा सचिन कैलास भालेराव या तरुणाने आंदर मावळात राहून पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

सचिनचे वडील कैलास भालेराव येथील पोल्ट्री फार्मात नोकरीला आहेत. आंदर मावळातील ही पोल्ट्री पहिली जिथे स्थानिकांना चाळीस वर्षांपूर्वी काम मिळाले. त्याची आई सुभद्रा गृहिणी आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत व न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन सचिनने तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. वाणिज्य शाखेच्या दुस-या वर्षात शिकत असताना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत त्याने निगडे येथील कॅम्प मध्ये २००९ मध्ये सहभाग नोंदवला. तेथे केलेल्या कामाने, कॅम्पमधील यशस्वी सहभागाने त्याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळवला आहे. लहानपणापासून त्याला अभ्यासाची आवड होती.

सचिनला युपीएससीची परिक्षा देऊन जिल्हाधिकारी व्हायचे होते. अडचणी खूप होत्या. त्यामुळे या परीक्षेची तयारी करता करता एमपीएससी तयारी केली.साधारणपणे २०१० परिक्षांची पासून कैलासने तयारी केली. पण शेतीवाडी नाही, लहान भावंडे आणि एकटे वडील कमवते. त्यामुळे घरची परिस्थिती तशी बेताची, पण वडीलांनी धीर दिला लहान भावांनी आधार दिला आणि आईने काटकसरीने संसाराचा गाडा ओढयला सुरूवात केली. शेलारवाडीतील काव्या करिअर अकॅडमीत त्याने दीड वर्षे व्यायामाचे धडे गिरविले. कुटूबांत कोणीच दहावीच्या पुढे शिकलेले नाही

तरी या बहादूर गडयांने युपीएससीच्या तयारीत उतरला, राज्य सेवा आयोगाच्या परिक्षा त्याने दिल्या पण एक दोन मार्काने त्यात अपयश यायचे पण तो खचून गेला नाही. यशाच्या जवळ जावून आलेल्या अपयशाने अनेक जण मूळ हेतू पासून दूर जातात पण याने मनाचा कल बिघडू दिला नाही. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास आणि सकारात्मक विचार ठेवून त्याने पोलिस उपनिरीक्षक हे पद मिळवले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts