महाराष्ट्र केसरीचे स्वप्न राहिले अपुरे.. पण पठ्ठ्याने मिळवले पोलिस उपनिरीक्षक व कक्ष अधिकारी पद
MPSC Success Story : आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुस्तीचा खर्च परवडत नव्हता. खेळाची आवड होती म्हणून ज्युदोकडे वळलो. त्यात अठरा वेळा राष्ट्रीय स्तरावर खेळला. पहिल्यांदाच स्पोर्ट्स कोट्यातून एमपीएससीची परीक्षा दिली आणि दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळाले.
ही यशाची कहाणी आहे. कोलवडी (ता. हवेली) येथील सदाशिव मुरलीधर साळुंखे या कष्टाळू आणि जिद्दी तरूणाची….त्याने लहानपणापासून मोठं यश मिळवायची जिद्द ठेवली होती. त्यामुळे शाळेतही कायम पहिला क्रमांक मिळवायचा. कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र केसरी मिळवावा, अशी त्याची वडिलांची इच्छा होती. वडिलांना कर्करोगाच्या दुर्धर आजाराने गाठले. त्यांचा दवाखाना नंतर मृत्यू अशाही परिस्थितीत मानसिक त्रास होऊनही परिस्थितीवर मात केली. अशा परिस्थितीतही त्याने नित्यनेमाने वाचन करून अभ्यास केला.पहिल्यांदाच स्पोर्ट्स कोट्यातून परीक्षा दिली आणि दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळवले.
त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा देण्याचे ठरविले. सध्या महाराष्ट्र प्रशासकीय सेवेमध्ये कक्ष अधिकारी मंत्रालय या राजपत्रित अधिकारी पदावर आयुष्याची नवीन सुरूवात करत असत यश मिळवले.