⁠
Inspirational

आय.टी क्षेत्र सोडून घेतला अधिकारी होण्याचा ध्यास ; शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलिस उपअधिक्षक !

MPSC Success Story : कधीकधी परिस्थिती बघून करिअर निवडावे लागते. तसेच सागरने देखील इंजिनिअर केले आणि कॅम्पस इंटरव्ह्यू मधून खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवली. पण लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न त्याला सतावत होते. त्यात घरच्या परिस्थितीमुळे नोकरी पण सोडता येत नव्हती. मग त्याने नोकरी व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे ठरवले.

पण दोन्ही एकत्रितपणे करणे त्याला काही जमत नव्हते. यामुळे त्याला तीनदा अपयश देखील आले. शेवटी सागरने २०१८ मध्ये नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. अशावेळी देखील त्याच्या घरचे खंबीरपणे उभे राहिले. सागर देशमुख हा सोलापूर जिल्ह्यातील बंकलागी येथील शेतकरी कुटूंबात वाढलेले मुलगा. त्याचे प्राथमिक शिक्षण हे गावच्या शाळेत झाले. पण त्याने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले होते. पुढे याच हुशारीवर त्याने डिप्लोमाचे शिक्षण सोलापूरातील एस.ई.एस पॉलिटेक्निक येथून पूर्ण केले.त्यानंतर व्हिआयटी, पुणे येथून पदवी शिक्षण घेतले.

हुशार आणि सगळ्यात अग्रेसर असल्याने त्याला नोकरी देखील लगेच मिळाली. प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांच्या वाटेवर त्याने नोकरी सोडली.‌ त्यावेळी नेमका कोरोना काळ परीक्षा पण पुढे जात होत्या.असं असले‌‌ तरी सागरने जिद्दीने‌ अहोरात्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.

अखेर त्याला २०२१च्या एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले असून त्याची पोलिस उपअधिक्षक पदी निवड झाली. याशिवाय इतर मुलांना मार्गदर्शन मिळावे यासाठी ते सारथी या युट्यूब चॅनलव्दारे मार्गदर्शन करत असतात.

Related Articles

Back to top button