⁠  ⁠

लहानपणी गुरे सांभाळली पण शिक्षणाची कास धरली; वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष यांचा हा प्रवास…

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story : आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीचे देखील सोने करणे जमले पाहिजे‌. तेच संतोष यांनी करून दाखवले. संतोष चव्हाण यांचे बालपण हे पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील दुर्गम भागातील साबळेवाडी ह्या छोट्याश्या गावात गेले. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच त्यामुळे गाई म्हशीसारखी गुरं पाळणे, ती सांभाळणे हे त्यांचे मुख्य काम. याशिवाय रहीचा व्यवसाय, जागरण गोंधळ, भराड घालने अशी कामे हे कुटुंब करीत असे….त्याचे आई -‌ वडील दोघेही अशिक्षित असले तरी संतोष यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला पूर्ण पाठिंबा मिळाला.

त्यांचे शालेय शिक्षण हे गावातच झाले. पुढे, पदवीचे शिक्षण हे बीएससी (कृषी), कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून पूर्ण केले.एमएससी (कृषी) साठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे प्रवेश घेतला. परंतू, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने एमएससी (कृषी) मधूनच सोडण्याचा निर्णय घेऊन पूर्ण वेळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तयारीला देण्याचा निर्णय घेतला. २०१४ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगानी घेतलेल्या वनसेवा तसेच विक्रीकर निरीक्षक पदासाठी परिक्षेचा २०१६ ला निकाल लागला. त्यात त्यांची वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच राज्यकर (विक्रीकर) निरीक्षकपदी निवड झाली. दोन ठिकाणी निवड झाली असली तरी त्यांनी वनसेवेत जाण्याचा निर्णय घेतला.

१८ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण, ऑल इंडिया टूर, परीक्षा पूर्ण केल्यानंतर १९ जानेवारी २०१८ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून सातारा जिल्ह्यात खंडाळा येथे सामाजिक वनीकरण येथे त्यांना पहिली नियुक्ती मिळाली. त्यानंतर ९ ऑगस्ट २०२१ रोजी मुळशी तालुक्यात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या संपूर्ण प्रवासात त्यांनी गोरगरिबांना बरीच मदत केली आणि वन संवर्धनासाठी वेळोवेळी पाऊल उचलत आहेत.

Share This Article
Leave a comment