⁠  ⁠

बसचालकाचा मुलगा झाला फौजदार; वाचा शरद मानेंचा प्रेरणादायी प्रवास..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

आपली परिस्थिती बदलणं हे आपल्याच हातात असते. याला जिद्द आणि मेहनतीची साथ देणे महत्त्वाचे असते. कागल तालुक्यातील पिंपळगाव गावातल्या शरद माने याने एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. शरदचे वडील बसचालक आहेत. तर आई गृहिणी आहे.

पण आई – वडिलांनी मुलाला उच्च शिक्षित करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले.शरदने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी साखर कारखान्यात हेल्पर म्हणून कामही सुरू केले. पण शिक्षणाची कास सोडली नाही. शरदचे शालेय शिक्षण हे गावातच झाले.शरदला दहावीच्या परीक्षेत ४३ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्याने पदवी शिक्षण पूर्ण केले. आपण अधिकारी झालो तर परिस्थिती नक्कीच बदलू शकते‌. ह ध्यास उराशी बाळगून त्याने पुणे गाठले.

पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. याच दरम्यान त्याचे लग्न पण झाले. दुसऱ्या बाजूला संसार करीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शरदने फौजदार परीक्षेत यंदा बाजी मारली. गेल्या महिन्यातच त्याला मुलगा झाला.कमी गुण असले तरी जिद्द सोडू नका, यश तुमचेच आहे. या विचार मनात घेऊन त्याने अहोरात्र मेहनत घेतली.

फौजदार होण्याची त्याची जिद्द होती. कुटुंबावर भार न टाकता त्याने अभ्यास सुरू ठेवला. या त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आणि शरद झाला एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण…यात त्याला पीएसआय हे पद मिळाले.कागल तालुक्यातील पिंपळगावच्या शरदने फौजदार परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक मिळविला. हे त्यांचे यश अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.

Share This Article