---Advertisement---

शेतकऱ्याच्या कन्येचे पोलिस उपनिरीक्षक पदी घवघवीत यश !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : आपल्या इकडे काही साध्य करण्याची जिद्द असेल तर यश हे मिळतेच. त्यासाठी घरचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. शीतल पाटील ही मूळची केर्ली या गावची लेक. तिच्या घरी एकत्र कुटुंब पद्धती आहे.तसेच, दोनवडे (ता. करवीर) येथे शेतकरी बाळू कृष्णा पाटील यांचे चार मुलांचे चौदा व्यक्तींचे एकत्र कुटुंब आहे. या कुटुंबात शीतल पाटील यांचा विवाह युवराज यांच्याबरोबर झाला. या सगळ्यांच्या सहकाऱ्यांनी तिने स्पर्धा परीक्षेत पाऊल टाकले आणि यात पोलिस उपनिरीक्षकपदी गवसणी घातली.

शितलचे गावच्याच प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. नंतर तिने विवेकानंद कॉलेज महाविद्यालयात उच्चमाध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खराडे कॉलेजमध्ये डी.एड पूर्ण केले. तिच्या विवाहानंतर स. ब. खाडे महाविद्यालय बी. एचे शिक्षण पूर्ण केले. तिने शिक्षणाची कास धरून‌ ठेवली होती. कारण, तिला लहानपणापासून अभ्यासाची आणि वाचनाची गोडी होती.

सुरुवातीपासूनच शीतल यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न होते. लग्नानंतर तिने ते स्वप्न जिद्दीने पूर्ण केले. घरचा गाडा सांभाळत आणि मिळेल त्या वेळेचा उपयोग करून शीतल यांनी उपनिरीक्षकपद मिळविले. ती सकाळी पाच वाजता उठून घरचे जेवण तयार करत अभ्यास करायचा, घरचे सर्व काम करत शीतल मिळेल त्या वेळेचा उपयोग करून ऑफलाईन, ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. या सगळ्यात मार्गदर्शन देखील आवश्यक असते म्हणून तिने २०१८ मध्ये टीईटी दिली. आमदार जयंत आसगावकर यांच्या सांगरुळ शिक्षण संस्थेच्या डी. डी. आसगावकर ट्रस्टच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रावर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. हा सारा संसारगाडा, अभ्यास सांभाळणे तसे अवघड होते. पण तिने ते स्वप्न पूर्ण करून दाखवले.या सगळ्या प्रवासात तिला कुटुंबांनी बरीच साथ दिली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts