हक्काचा आधार हरपला, पण पोरीने जिद्दीने मिळविले MPSC परीक्षेत यश
MPSC Success Story प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अडचणी येतात. पण या अडचणींवर मात करत यश गाठले तर नक्कीच कौतुकास्पद ठरते. अशीच श्रद्धा किसन(धनंजय) उरणे. अत्यंत कठीण काळात तीने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. तिची आई तिच्या पाठीशी ठाम उभी राहिली. मोलाची साथ देत तिला धीर दिला. तिचे वडील अनगर येथील लोकनेते व्यापारी गाळ्यात मोटार सायकल पंक्चर काढण्याचे दुकान चालवीत होते.
तिच्या या उत्तुंग यशाने दिवंगत वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता केली आहे.वडील दुचाकीचे पंक्चर काढण्याचा व्यवसाय करायचे, मुलगी अकरावीला असताना दुर्धर आजाराने त्यांचे निधन झाले. त्यामुळे वडिलांना तिच्याबद्दल आत्मविश्वास होता. एकदिवस ही अधिकारी होऊन दाखविणार असे ते इतरांना नेहमी सांगत.ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने देखील मेहनत घेतली.
श्रध्दाचे प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या प्राथमिक शाळेत झाले.चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती धारक होऊन तिने आपल्या हुशारीची चुणूक दाखवली. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणही येथील (कै.) शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्ण केले. तर महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पुणे येथे राहून पूर्ण केले. त्यानंतर तिने वडिलांचे व स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला.
त्यासाठी ती दिवसाचे १० ते १२ तास अभ्यास करायची. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सर्वच स्पर्धा परीक्षा दिल्या. त्यामध्ये मला प्रथम तलाठी दुय्यम निबंधक श्रेणी – १ आणि मंत्रालयीन उपकक्ष अधिकारी या परीक्षांत यश मिळाले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम उपनिबंधक श्रेणी – १ या पदासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या मुख्य आणि एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये येथील श्रद्धा किसन(धनंजय) उरणे ही राज्यातील ओबीसीच्या ४९ जागांमधून मुलीमध्ये पहिली आली आहे.