सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी झाली क्लास वन अधिकारी ; वाचा तिची यशोगाथा!
आपल्याला परिस्थितीसोबत सामना करायला जिद्दच ताकद देते. मग परिस्थिती कोणतीही असू दे….तिचं जगण्याला उमेद देत असते. डॉक्टर सोनाली पाईकराव ही शेतकऱ्याची लेक.गावातील जडणघडण झाली असली तरी घरच्यांच्या पाठिंब्यामुळे उच्च शिक्षित झाली. पुढे लग्नानंतर वर्ग एक अधिकारी बनली.
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात वाहेगाव हे छोटसं गाव आहे. याच गावामध्ये पाईकराव कुटुंब राहते. कुटुंबामध्ये एकूण पाच बहिणी आणि एक भाऊ….सोनाली यांचा विवाह डॉक्टर चेतन कुमार खंडेलोटे यांच्याशी झाला. तेव्हा त्यांनी आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न सांगितलं. त्यांनी देखील सोनाली यांच्या इच्छेला होकार दर्शवत एमपीएससीचा अभ्यास करण्यास सांगितले.
लहानपणापासूनच अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न होतं. तिचे शालेय शिक्षण हे ग्रामीण भागातील झेडपीच्या विद्यालयात झाले. घरात शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण असल्याने सगळ्या मुलींनी उच्च शिक्षण घेतले. सोनाली पाईकराव यांनी देखील बीएचएमएसचे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अहोरात्र अशी मेहनत घेतली.
पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशी तिन्ही टप्पे पार करून त्यांनी राज्यसेवा परीक्षेत शिखर पार केलं. हा प्रवास खूप खडतर होता. त्यांना खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागले. या प्रवासात कुटुंबीयांची भक्कम साथ मिळाली. त्यामुळेच, राज्यसेवा परीक्षेत क्लास वन हे पद मिळाले. यामुळे सोनाली यांना अधिकारी म्हणून काम करताना संवेदनशीलतेने काम करायचे असून आणि समाजातील जास्तीत जास्त लोकांना कसा लाभ होईल हा प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट आहे.