⁠
Inspirational

कामगाराच्या लेकाचे MPSC च्या परीक्षेत दुहेरी यश; वाचा या युवकाची यशोगाथा!

MPSC Success Story : घरची परिस्थिती अगदी सामान्य…कोरडवाहू शेती असून, शेतीमध्ये मुलांचे शिक्षण आणि घरखर्च भागत नसल्याने वडील आणि मोठ्या भावाने शहरातील एमआयडीसीमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. पण सोनूच्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.जालन्यातील गणपती गल्लीतील मगन आवटे व कलावती आवटे या दाम्पत्याला तीन मुले आहेत. त्यांनी तिन्ही मुलांना उच्च शिक्षित केले. सोनूने परिस्थिती बदलण्यासाठी सरकारी अधिकारी होण्याचा निर्धार मनाशी ठेवला.

साेनूचे शालेय शिक्षण जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयातून २०२१ मध्ये पूर्ण केले आहे. सोनूने आई-वडिलांच्या खांद्याला खांदा लावून कामही केले. सोनूने कठीण काळातही शिक्षण व अभ्यासाची नाळ तुटू दिली नाही

शहरातील कंपनी कामगार कुटुंबातील साेनू आवटे या युवकाने जिद्द, चिकाटी व कठोर मेहनतीच्या बळावर ‘एमपीएससी’च्या परीक्षेत दुसऱ्याच प्रयत्नात यश संपादन करून वयाच्या २४ व्या वर्षी ‘सहायक कक्ष अधिकारी’ (ASO) आणि राज्य कर निरीक्षक या दोन्ही पदांना एकाच वेळी गवसणी घातली आहे. सामान्य कुटुंबातील युवकाने या दोन्ही पदांवर मजल मारून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

यात सोनूला दोन्हींपैकी एकाच पदाची निवड करावी लागणार आहे.सोनू याने २०२१ मध्ये ‘एमपीएससी’ची पूर्वपरीक्षा दिली; परंतु त्यात अपयश आले. त्यांनतर २०२२ मध्ये पुन्हा पूर्वपरीक्षा दिली. त्यात यश आल्यानंतर मुख्य परीक्षा ऑक्टोबर २०२३ मध्ये दिली. त्यातही यश मिळाले. या परीक्षेचा अंतिम निकाल २८ डिसेंबर रोजी जाहीर झाला. यात सोनूने यश संपादन करून ‘सहायक कक्ष अधिकारी’ (ASO) आणि राज्य कर निरीक्षक या दोन्ही पदांना गवसणी घातली आहे. महाराष्ट्रातून एकूण २७ वा क्रमांक आणि अ.दु.घ. (EWS) प्रवर्गातून त्यांनी ४ था क्रमांक पटकाविला आहे.

Related Articles

Back to top button