---Advertisement---

एकामागोमाग एक सरकारी पदांवर बाजी ; तृप्तीची तहसीलदार पदी निवड…

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story आपण जे स्वप्न बघत असतो…त्यात सातत्य असेल तर यश नक्कीच मिळते. गेल्यावर्षी तृप्तीची महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेतून उपअधीक्षक भूमी अभिलेख या निवड झाली होती. इतर मागास प्रवर्गात तृप्ती हिने राज्यात महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. सध्या ती संभाजीनगर येथे प्रशिक्षण पूर्ण करीत असताना नुकत्याच लागलेल्या निकालात तिची तहसीलदार पदी निवड झाली आहे. तिने पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होऊन आई – वडिलांची स्वप्नपूर्ती केली आहे. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे एमपीएससी परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे.

तृप्ती संभाजी खैरनार ही बागलाण तालुक्यातील डोंगरेज या गावची लेक.तृप्तीचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये झाले.तिचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या अभिनव बालविकास मंदिर शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण मविप्र संचलित मराठा हायस्कूलमध्ये प्रथम श्रेणीत पूर्ण केले. अकरावी, बारावी तसेच इंजिनिअर कॉलेज के. के. वाघ कॉलेजमध्ये झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षेचे ध्येय मनाशी बाळगले. यात सातत्य व नित्यनेमाने वाचन करत राहिली‌. या संपूर्ण प्रवासात तिला गावातील उत्तीर्ण झालेल्या इतर अधिकाऱ्यांची देखील मदत लाभली.

योग्य मार्गदर्शन आणि नियोजन असेल तर यश मिळतेच.असेच, तृप्तीने २०२२ मध्ये दिलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तहसिलदार पदाच्या परीक्षेत यश मिळवून गावाचे नाव मोठे केले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts