⁠  ⁠

पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होऊन आई वडिलांची स्वप्नपूर्ती; तृप्तीची भूमी अभिलेख उपअधिक्षकपद

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : आपल्या आई – वडिलांचे स्वप्न असते की कुटुंबातील एकजण तरी सरकारी अधिकारी व्हावे. असेच स्वप्न तृप्तीच्या आई – वडिलांनी बाळगले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तृप्तीने देखील मेहनत घेतली. बागलाण तालुक्यातील डोंगरेज तृप्ती खैरनार ही रहिवासी. तृप्तीचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या अभिनव बालविकास मंदिर शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण मविप्र संचलित मराठा हायस्कूलमध्ये प्रथम श्रेणीत पूर्ण केले.

बारावीनंतर अभियांत्रिकी (मॅकेनिकल) शाखेत प्रवेश घेतला. पदवीचे शिक्षण घेत असतानाच तृप्तीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेकडे आपले लक्ष केंद्रित केले.स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असली तरी, रचनात्मक सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी, मेहनत ही त्रिसूत्री हमखास यशाची गुरुकिल्ली आहे. हे लक्षात घेऊन अभ्यास केला. तिने स्वयं अध्यनाबरोबरच अभ्यासात सातत्य ठेवले.

डोंगरेज येथील तृप्ती लहानपणापासून अभ्यासात हुशार होती.स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी तिने सातत्यपूर्ण अभ्यास सुरू केला. त्यानंतर राज्यकर निरीक्षक परीक्षेत पूर्व व मुख्य परीक्षेत यश मिळविल्याने तिचा आत्मविश्वास अधिकच वाढला.तृप्ती हिस पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात भूमी अभिलेख उपअधीक्षकपदाला गवसणी घातली.या यशासह इतर मागास प्रवर्गात तृप्ती हिने राज्यात महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

Share This Article