⁠  ⁠

झिरपवाडीच्या पोराने मिळवले तहसीलदार हे पद !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story खरंतर स्पर्धा परीक्षा करणे हे मोठे आव्हानात्मक काम असते. यात कधी यश येते तर कधी अपयश…पण जर जिद्दीने स्वप्न बघितले तर आपण कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकतो.

असेच तुषार लक्ष्मणराव गुंजवटे या तरूणाचे जिद्दीने अभ्यास करून स्वप्न पूर्ण झाले आहे. तुषारची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. तुषार गुंजवटे याचे मूळ गाव झिरपवाडी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण मालोजीराजे प्राथमिक विद्या मंदिर, फलटण येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे झाले.

त्यानंतर शासकीय इंजिनिअर कॉलेज कराड येथे ई अँण्ड टी. सी. इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले. ऑल इंडिया श्री शिवाजी राजे मेमोरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणानंतर टाटा कन्सलटिंग सर्विस पुणे येथे नोकरी पण मिळाली.

पण या नोकरीत मन काही रमले नाही.‌ म्हणून त्यांनी आपल्या स्वप्नांची वाट धरली. स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली.‌ खरंतर नोकरी सोडून ‌हा निर्णय घेणे, हा मोठा निर्णय होता. पण त्याचा स्वीकार करून त्यांनी तहसीलदार हे पद मिळवले.

Share This Article