---Advertisement---

शेतकऱ्याच्या लेकाची कर सहाय्यक पदावर गगनभरारी !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : गावचे जीवन…कमी एकर शेती… आर्थिक परिस्थिती बेताची अशा परिस्थितीत देखील उच्च शिक्षण आणि पदासाठी कास धरली तर नक्कीच स्वप्न होते. हे विकास शेवाळे याने दाखवून दिले. खामखेडा येथील अल्पभूधारक शेतकरी संजय वामन शेवाळे त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यांना विकास व अमोल ही दोन मुले. विकास हा त्यांचा थोरला मुलगा. त्याचे देशसेवा करण्यासाठी सैन्य दलात जावे हे स्वप्न होते. त्यासाठी तो प्रयत्न देखील करत होता. या साऱ्यात अडथळा येत होता.

तरीही, परिस्थितीचा बाऊ न करता मेहनत व परिश्रम घेतले तर जीवनात यश हमखास मिळते, हे त्याला पक्के माहिती होते. मराठा लाईट इन्फ्रटी बेळगाव येथे सैन्य दलाच्या प्रशिक्षण केंद्रात नऊ महिने खडतर प्रशिक्षणानंतर त्याची भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून पहिली निवड झाली. मात्र, पळण्याचा सराव करत असताना पाय फॅक्चर झाला व सैन्य दलातील नोकरी कायमस्वरूपी सोडावी लागली

वैद्यकीय कारणामुळे सैन्यदलातून अनफिट ठरत घरी यावे लागल्याने येथील विकास शेवाळे याने पदवी पूर्ण करीत कोरोनाकाळात घरीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.२०१९ मध्ये पदवी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध परीक्षा देऊ लागला. त्याच्या या कष्टाला फळ मिळाले आणि लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहाय्यक पदाची परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts