⁠  ⁠

सैन्य भरतीत अपयश आले; पण पठ्ठ्याने कर सहाय्यक पद मिळवून दाखवले..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : खरंतर, आपल्या आयुष्यातील अपयश हे कायम आपल्याला नव्या यशाची वाट दाखवत असते. तसाच, विकास शेवाळे याचा प्रवास आहे. विकास हा मूळचा खामखेडा येथील रहिवासी. त्याचे वडील संजय वामन शेवाळे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. पदरी पाच एकर जमीन….त्यावर सर्व कुटुंब चालत असे.

विकासला लहानपणापासून वर्दीचे आकर्षण होते. त्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. विकास हा त्यांचा थोरला मुलगा. विकास बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला आणि लगेचच २०१४ मध्ये जव्हार येथे झालेल्या सैन्यदलाच्या भरतीत सैन्यात भरला गेला. त्यात त्याची निवड देखील झाली. पण नऊ महिने खडतर प्रशिक्षणानंतर त्याची भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून पहिली निवड झाली. मात्र, पळण्याचा सराव करत असताना पाय फॅक्चर झाला व सैन्य दलातील नोकरी कायमस्वरूपी सोडावी लागली.

हातची नोकरी गेल्यामुळे तो खचून गेला. अनफिट ठरत घरी यावे लागल्याने येथील विकास शेवाळे याने पदवी पूर्ण करीत कोरोनाकाळात पुन्हा घरीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.यात त्याला यश आले. त्याची नुकतीच पालघर येथे कर सहाय्यक म्हणून नेमणूक झाली. परिस्थितीचा बाऊ न करता मेहनत व परिश्रम घेतले तर जीवनात यश हमखास मिळते, असेच विकासने दाखवून दिले आहे.

Share This Article