MPSC Success Story जेव्हा एखाद्या गावातील मुलगा एमपीएससीच्या परीक्षेत बाजी मारतो. तेव्हा अनेकांना प्रेरणादायी गोष्ट ठरते. हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथे राहणारा विश्वजित श्यामराव पाटील. याने एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विश्वजीतचे वडील श्यामराव पाटील हे निवृत्त मुख्याध्यापक आहेत तर आई गृहिणी आहे. या परीक्षेसाठी त्याला श्रीनिवास पाटील व श्रेयस बडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.विश्वजितचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पाराशर हायस्कूलमध्ये झाले. तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनियर पदवी संपादन केली. हे पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली.
त्यासाठी त्याने तयारीला सुरुवात केली. त्याने संपूर्ण परीक्षा वस्तूनिष्ठ असल्याने प्रश्नपत्रिकांचं अवलोकन करण्यात अतिशय महत्त्व दिले. तर चालू घडामोडींवर सतत लक्ष ठेवलं. हे त्याचा पाच वर्षांच्या खडतर प्रवास होता.या मेहनतीच्या जोरावर त्याने या परीक्षेमध्ये ४०० पैकी ३०६ गुण संपादन करून विश्वजित पाटीलने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. यात त्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधक ( सब रजिस्टर ) म्हणून निवड झाली आहे.त्याच्या यशात आई-वडील, भाऊ यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. .