⁠
Inspirational

सकाळी शेतीची कामे, रात्री सिक्युरिटी गार्डची ड्युटी अन् दिवसा अभ्यास ; मेहनतीच्या जोरावर योगेश बनला फौजदार !

MPSC Success Story सिन्नर तालुक्यातील गोदे या गावात येथील योगेश सुधाकर चव्हाण ह्या जिगरबाज युवकांची किमया थक्क करणारी ठरली आहे. लहानपणापासून त्यांनी फक्त आणि फक्त संघर्ष बघितला. त्या संघर्षावर मात करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले. घरी अवघी दोन एकर शेती…. शेती आहे पण पाणी नसल्याने फारसे उत्पन्न येत नाही. योगेशने जिद्दीने नाव कमावले. गायींचे सेवा काम धंदा करून अभ्यास केला. तो फौजदार झाल्याने सर्वजण भारावून गेले आहेत. थोरला मुलगा रामदास, फौजदार योगेश यांच्यासह दोन मुली असा परिवार आहे. घराच्या स्थिती मुळे थोरला मुलगा रामदास मुसळगाव औद्योगिक वसाहतीत चहाची टपरी चालवितो. योगेशने देखील गायी गोठ्यामध्ये जनावरांचे संगोपन करून त्यांना चारा वैराण करणे रात्री वेळेस काम जाताना दुभत्या जनावरांचे दूध काढणे हे काम नित्यनेमाने केले.

योगेशने दहावी नंतर सिन्नर कॉलेजला बी.एस्सीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण करताना पोट भरावा लागते हे कॉलेज जीवनात अनुभव घेतला. २०१५ला अशोका बिल्डिंग ग्रुपच्या प्रतिक हॉटेल मध्ये रात्रीच्या वेळेस सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करण्याची संधी मिळाली.सिक्यूरिटी गार्ड नाईट कामातून वेळ मिळाला की तो अभ्यास करायचा. रात्र पाळी करणे अन् सकाळी कॉलेज ही दिनचर्या ठरलेली होती. त्यांनी पुढे स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला. लोकसेवा आयोगाच्या परिक्षा चा हट्ट सोडला नाही. गोंदे मुसळगाव अन् सकाळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या लोकनेते अभ्यासिका हा प्रवास सुरू ठेवला. सिक्युरिटी गार्डच्या नाईट कामांचा फायदा झाला.

हा दिनक्रम तर चालू होता. पण या काळात दोन वर्षांच्या करोना कालावधत सिक्युरिटी गार्ड काम सुटले. आता पुढे काय करायचे हा प्रश्न होता. २०१६ला बीएस्सी पूर्ण होताना जालनाच्या पोलिस उपनिरीक्षक शुभम कोरडे ह्या मित्राने योगेशला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा दे असे सांगितले. त्यापासून त्याने वर्दीचा ध्यास घेतला. पण आर्थिक चणचण तर होतीच. यामुळे त्याने मुसळगावच्या सोलेर ऊर्जा प्लॅन मध्ये योगेश काम करू लागला. यातून थोडे पैसे जमल्यावर त्याने २०२१ला पुण्यात स्पर्धा परिक्षेचे क्लासेस केले. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या घरच्यांनी त्याला खूप पाठिंबा दिला. सतत अभ्यास, मैदानी सराव आणि नोकरी करून देखील अखेर जिगरबाज योगेशचे फौजदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

Related Articles

Back to top button