MPSC Success Story हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथील योगेश बाळू चवरे याने स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. खरंतर सरकारी अधिकारी होण्याची इच्छा अनेक तरुणांनीची असते, काही जणांना ग्रामीण भागातील अडचणी आणि अपूऱ्या सोयी- सुविधा यामुळे तयारी करता येत नाही. अशा तरुणांची योगेश चवरेची प्रेरणादायी कहाणी नक्की वाचा…
योगेशचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. पदरी दोन मुले….मंगेश चवरे आणि योगेश चवरे. शेतकरी जीवन असले तरी त्यांनी दोन्ही मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिले. आज दोन्ही मुलांनी बापाच्या कष्टाचे चीज केले. मोठा मुलगा आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि आता दुसरा मुलगा योगेश कर सहाय्यक झाला आहे.
योगेशचे सुरुवातीचे शालेय शिक्षण साखरा गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतले. तर महाविद्यालयीन शिक्षण रिसोड येथील शिवाजी कॉलेजमध्ये घेतले. या महाविद्यालयातील काळात त्याला स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली.
त्यामुळे त्याने औरंगाबाद येथे एमपीएससीचे क्लास देखील केले. तो दररोज सकाळी लवकर उठून ग्रंथालयात जायचा नियमितपणे अभ्यासाचे नियोजन करायचा. याच मेहनतीच्या जोरावर त्याने २०२२ मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली. त्याने कर सहाय्यक परीक्षेत अनुसूचित जातीतून राज्यात अकरावा क्रमांक मिळवला आहे. तर याचदरम्यान तो मंत्रालय लिपिक ही परीक्षादेखील उत्तीर्ण झाला.