हलाखीच्या परिस्थितीलाही झुगारून बनला सहायक गटविकास अधिकारी ! वाचा योगेशच्या जिद्दीची कहाणी
MPSC Success Story : आर्थिक परिस्थिती बेताची…वडिलांचा आधार हरपला…आर्थिक परिस्थिती इतकी कठीण होती की वडिलांच्या उपचारासाठी जवळ कांहीच नव्हते यावेळी नातेवाईकांनी केलेली मदत देखील वडिलांना वाचवू शकले नाहीत.बालवयातही कुटुंबाची होत असलेली आर्थिक फरफट स्वस्थ बसू देत नव्हती. आपण काहीतरी बनायला हवं. तरच परिस्थिती सुधारेल या गोष्टीसाठी त्याने जिद्दीने अभ्यास केला. ही जीवन कहाणी योगेश मोहन कांबळे या युवकाची आहे. त्याची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्य गटविकास अधिकारी पदावर निवड करण्यात आली आहे.
घरातला कमवता पुरुष गेल्याने घराच्या उदरनिर्वाहची जबाबदारी आईवर आली. योगेशला एक मोठी बहीण आणि एक भाऊ आहे. तो पाचवीत असतांना २००५ मध्ये बकऱ्याच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करून घर चालविणाऱ्या वडिलांना एक आजार झाला आणि त्यातच ते गेले.वडील हयात असतानाच बहिणीचे लग्न झाले होते. आई आणि थोरला भाऊ मिळेल ते काम करून कुटुंब चालविण्याचा प्रयत्न करीत होते. दहावीनंतर हॉस्पिटलमध्ये काम करीत स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचू लागला त्यानंतर आई आणि मोठ्या भावाने कुटुंब निर्वाहसाठी उपसलेले कष्ट हे मनाला वेदना देणारे होते. आपल्या शिक्षणाचाही खर्च कुटुंब पेलू शकत नसल्याने त्याने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणे सुरू केले.
रात्रपाळी असली की पेशंट संपल्यावर तो रात्र रात्र अभ्यास करायचा. सोबतचे मित्र आणि त्याचे शिक्षक त्याला मार्गदर्शन करायचे. पदवीनंतर तो पहिल्यांदा टॅक्स असिस्टंट म्हणून पास झाला.त्या नंतरही त्याने परीक्षा देणे सुरूच ठेवले. नंतर पीएसआय झाला मात्र याचा नाद सोडून तो पुन्हा विक्रीकर इन्स्पेक्टर यासाठी सलेक्ट झाला. नोकरी करीत तो अभ्यास करीत राहिला व परीक्षा देत राहिला. पाच दिवसांपूर्वी त्याची सहायक गटविकास अधिकारी म्हणून निवड झाली आहे. सारे काम करीतच तो सहायक गटविकास अधिकारी बनला. ही जिद्दीची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.