MPSC Success Stoty : कमी वयात देखील यशाची पायरी गाठता येते. हे भावना विजय भिंगारदिवे हिने करून दाखवले आहे. तिने वयाच्या बावीसाव्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले. इतकेच नाहीतर अनुसूचित प्रवर्गात महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवला. आजवर आई-वडीलांनी आणि स्वतः घेतलेले कष्ट, तिने ज्या खाच खळग्यांतून मार्ग काढला, त्याचे सार्थक झाले. जे हवं होतं ते यश अखेर मिळवलंच.
तिने आई- वडीलांचा विश्वास सार्थ ठरवला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ती वहीवर नाव देखील PSI भावना भिंगारदिवे असं लिहायची. तिला लोक हे असं बघून हसायचे. पण तिनं स्वतःला इतकं स्थिर ठेवलं आणि विचार केला की यांना आता उत्तर देणं आवश्यक नाही. मला पद मिळालं की उत्तर नक्कीच मिळेल. ती तिच्या बहिणीला कायम सांगायची की वयाच्या २२व्या वर्षी मी नक्कीच कोणत्या ना कोणत्या पदावर बसलेले असणार, ते पद कोणतं आता नाही सांगू शकत पण पद नक्कीच माझ्याकडे असेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तिने अभ्यास केला.
या काळात पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आता मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्याला जावं लागेल, हे सांगायचं धाडस होईना. कारण तिच्या घरात याआधी कुणीच घराबाहेर राहिलं नव्हतं. तिनं धीर एकवटून हे घरी सांगितलं. कारण, मुख्य परीक्षेला एकच महिना बाकी होता. नवे शहर, नवे काही स्थिरता येण्यातच महिना गेला. या दरम्यान अस्वस्थता यायची. पण तिला वडीलांनी धीर दिला की कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन नसतानाही मुलीनं पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. आता ती ही पण परीक्षा उत्तीर्ण होईल. या वडीलांच्या विश्वासाला तडा जाऊ नये. म्हणून तिने झोपेचा वेळ सोडला तर जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला. या दरम्यान मोबाईल पण बंद केला.
मुख्य परीक्षेच्या निकालानंतर भावनाला खेळाची पार्श्वभूमी नव्हती आणि ती स्वतः याआधी कोणत्या प्रकारच्या खेळात तरबेज नव्हती. तिला पळायचं याची माहिती नाही की गोळा फेकतात हे लांबच पण धरतात कसा हे ही माहिती नव्हतं. पुण्यात तर सराव करायची पण भावना नगर जिल्ह्यातल्या तिच्या गावी देखील मैदानी सराव करायची. घराजवळच एक छोटं मैदान होतं, तिनं तिथं जाऊन तिनं सराव केला. मैदानावर जे चांगले लोक भेटले, त्यांनी तिला मदत केली. एक ग्रुप होता, त्याच्या मार्गदर्शनामुळे तिच्या या अडचणी दूर झाल्या. तिच्या भावाने तिला गोळाफेक बद्दलचं मार्गदर्शन केलं.
जबरदस्त इच्छाशक्ती असेल ना तर मार्ग मिळत जातात आणि अडचणी दूर होत जातात. ह्याचे हे उदाहरण आहे.तुम्ही खरेपणाने मुलाखतीला सामोरे गेलात. जसे आहात तसे तिथे दाखवले तर मुलाखत देखील चांगली होते. म्हणूनच तिची देखील मुलाखत ही चांगली झाली. हे सर्व यशस्वीपणे टप्पे पार करून अखेर भावना पीएसआय ऑफिसर बनली.