MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा टोल फ्री क्रमांक देईल आधार !
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना कित्येकदा मदतीचा आधार हवा असतो.एखाद्या शंकेचे निरसन करण्यासाठी व परीक्षेविषयी माहिती हवी असल्यास हा टोल फ्री नंबर अधिक उपयोगी पडू शकतो.तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जप्रणालीतील अडचणींचे निवारण यामार्फत होवू शकते.याविषयी तपशीलवार माहिती:-
टोल फ्री नंबर-
१) १८००-१२३४-२७५ २)१८००-२६७३-८८९
टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्राव्दारे सद्यस्थितीत खालील मुद्यांच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध होऊ शकेल:-
(१) ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण स्वरुपाच्या अडचणी / शंकाचे निवारण होईल.
(२) ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या अनुषंगाने तांत्रिक/सर्वसाधारण पात्रता अथवा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबतच्या अडचणींचे निवारण.
३) उपरोक्त टोल फ्री क्रमांकावर प्राप्त होणारे दूरध्वनीचे संभाषणाचे (Telephone Calls) आयोगाच्या कार्यालयाकडून संनियंत्रण व विश्लेषण केले जाईल.
४) प्रस्तुत टोल फ्री क्रमांक दिनांक २ मार्च, २०२१ पासून खालील वेळापत्रकानुसार कार्यान्वित राहील:-
सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.०० ते रात्री ८.०० शनिवार व रविवार सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३०
५) टोल फ्री क्रमांकाच्या सुविधे व्यतिरिक्त उमेदवारांना support-online@ mpsc.gov.in या ईमेल आयडीवर तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने संपर्क साधता येईल.