⁠  ⁠

MPSC Update : गट-ब संयुक्त परीक्षेत बदल ; अशी असेल सुधारित परीक्षा योजना

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read

महाराष्ट्र दुय्यम सेवा MPSC अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेत आता ‘दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक, अराजपत्रित गट-ब’ संवर्गाचा समावेश करून आयोगाने सुधारित परीक्षा योजना आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे आता PSI-STI-ASO संयुक्त पूर्व परीक्षेत दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक [Sub Registrar ( Grade – 1 ) / Inspector of Stamps] ह्या पदाचा देखील २०२२ च्या परीक्षेपासून समावेश असेल. तेव्हा महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मधील या ४ पदांसाठी या पुढे संयुक्त पूर्व व स्वतंत्र मुख्य परीक्षा आयोगामार्फत घेतली जाणार आहे.

संवर्ग / पदे :

सहाय्यक कक्ष अधिकारी
फक्त बृहन्मुंबईतील विविध व मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय

राज्य कर निरीक्षक
राज्य शासनाच्या राज्य कर व विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात.

पोलीस उप निरीक्षक

राज्य शासनाच्या पोलीस दलाच्या कोणत्याही कार्यालयात

दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक
राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक महाराष्ट्रातील कोठेही.

संक्षिप्त परीक्षा योजना : येथे क्लिक करा

परीक्षेचे टप्पे :
१ प्रस्तुत चारही संवर्ग / पदावरील भरतीकरीता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
२ संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज करणा-या उमेदवारांकडून ते यांपैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त संवर्ग पदांसाठी बसू इच्छितात किंवा कसे, याबाबत विकल्प (Option) घेण्यात येईल.
३ संबंधित संवर्ग/पदाकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित पद भरतीकरीता अर्ज समजण्यात येईल/येतील.
४ संयुक्त पूर्व परीक्षेस अर्ज करताना दिलेला विकल्प तसेच, भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित संवर्ग/पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करुन, सामाईक पूर्व परीक्षेच्या आधारे चारही संवर्ग/पदांकरीता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.
५ संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्ग/पदाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांची स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

६ चारही संवर्ग / पदांकरीता मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक १ सामाईक असेल व सदर पेपरची परीक्षा एकाच दिवशी एकत्र घेण्यात येईल.
७ मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक २ मात्र संबंधित संवर्ग/पदांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या विचारात घेऊन स्वतंत्रपणे घेण्यात येईल. ग्वांगडोंग
८ संबंधित संवर्ग / पदाच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
९ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी उमेदवारांची संख्या विहित मर्यादेत सिमित करण्यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येते. पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांस मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येते.
१० पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जाणार नाहीत.

या नवीन पदासाठीची वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता ही : STI व ASO प्रमाणेच असेल.
अधिक माहितीसाठी : विस्तृत PDF डाउनलोड करा.

Share This Article