MSC Bank Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील दि जव्हार अर्बन को-ऑप. बँक लि., जव्हार या अग्रगण्य नागरी सहकारी बँकेमध्ये भरती भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 (मुदतवाढ) आहे.
एकूण रिक्त जागा : 08
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेनी ज्युनिअर क्लार्क 06 पदे
शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक इंग्रजी व मराठी टायपिंग (आय. एस. एम. फॉन्ट) आवश्यक.
2) ट्रेनी क्लार्क 01 पद
शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य, संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक, इंग्रजी व मराठी टायपिंग (आय. एस. एम. फॉन्ट) आवश्यक.
3) ट्रेनी सिनिअर क्लार्क 01 पद
शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक, इंग्रजी व मराठी टायपिंग (आय. एस. एम. फॉन्ट) आवश्यक
वयोमर्यादा – 22 ते 35 वर्षे
परीक्षा फी : रु. 1000/- अधिक 18% जी.एस.टी. असे एकूण रु. 1180/
नोकरी ठिकाण – ठाणे व पालघर
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. महाव्यवस्थापक, एचआरडी अँड एम, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई 400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जुन 2023 (मुदतवाढ)
अधिकृत संकेतस्थळ : www.mscbank.com
Application Form : येथे क्लीक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
निवड प्रक्रिया :
बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
लेखी परीक्षेत ५०% गुणांसह उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांनाच मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.
अपात्र उमेद्वारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.
अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
उमेद्वाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा. जे निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिले पाहिजे.
परीक्षेचे कॉल लेटर्स, मुलाखतीचे कॉल लेटर्स तसेच इतर पत्रव्यवहार (असल्यास) इ. उमेद्वारांना त्यांच्या अर्जात दिलेल्या ई-मेल आयडीवर केवळ ई-मेलद्वारेच पाठविण्यात येतील.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.