⁠  ⁠

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत 75 जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MSC Bank Recruitment 2024 महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 75

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 25 पदे
शैक्षणीक पात्रता :
उमेदवारांनी किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यांनी मॅट्रिकची परीक्षाही मराठीसह एक विषय म्हणून उत्तीर्ण केलेली असावी.
2) प्रशिक्षणार्थी सहयोगी – 50 पदे
शैक्षणीक पात्रता
: कोणत्याही शाखेतील किमान ५०% गुणांसह पदवीधर पदवी आवश्यक आहे. उमेदवाराने मॅट्रिकची परीक्षा मराठी विषयांपैकी एक विषय म्हणून उत्तीर्ण केलेली असावी. टायपिंगसाठी सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 32 वर्षे

परीक्षा फी :
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – ₹1,770/- (Includes GST)
प्रशिक्षणार्थी सहयोगी – ₹1,180/- (Includes GST)
इतका पगार मिळेल:
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – ३०,०००/- ते ४९,०००/-
प्रशिक्षणार्थी सहयोगी – २५,०००/- ते ३२,०००/-

नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : https://www.mscbank.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article