महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी; असा करा अर्ज?
MSF Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत भरती आयोजित करण्यात आली असून या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. जीएसटी लेखापरिक्षक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत चार्टड अकाउंटंटच्या ऑफिसरमध्ये काम केलेले असावे. कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव असावा. त्याचसोबत जीएसटीचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. त्यांच्या अनुभवावर त्यांची निवड केली जाणार आहे. त्यांन जीएसटी ऑडिट आणि संबंधित विषयात ज्ञान असणे गरजेचे आहे. यासाठी तुमची निवड झाल्यास तुम्हाला ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली.
या नोकरीसाठी अर्ज महाराष्ट्र राज्य सुरक्षा विभाग, ३२वा मजला, सेंटर १, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे पाठवायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याचा नमुना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.या नोकरीसाठी उमेदवारांनी १७ नोव्हेंबर २०२४ पूर्वी अर्ज करायचे आहेत.