⁠
Jobs

महाराष्ट्रात सरकारी नोकरीची संधी.. ‘या’ पदांसाठी निघाली बंपर जागांवर भरती

MTDC Recruitment 2023 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित मध्ये विविध पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 39

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक अधिक्षक (गट-क) 01
शैक्षणिक पात्रता : कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, अभियांत्रिकी किंवा कृषी यातील पदवी किंवा त्याच्या समतुल्य म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता.

2) कनिष्ठ अभियंता (गट-क) – 01
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणुन मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता.

3) जतन सहायक (गट-क) – 02
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदविका किंवा पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता.

4) तंत्र सहायक (गट-क) – 06
शैक्षणिक पात्रता : प्राचीन भारतीय इतिहासात पदव्युत्तर पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता, किंवा प्राचीन भारतीय इतिहास किंवा संस्कृती, किंवा मध्ययुगीन भारतीय इतिहास विषयासह इतिहासात पदव्युत्तर पदवी, किंवा संस्कृत किंवा पाली आणि प्राकृत विषयात पदव्युत्तर पदवी.

5) मार्गदर्शक व्याख्याता (गट- क) – 01
शैक्षणिक पात्रता : माध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याशी समतुल्य मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण.

6) उप आवेक्षक (गट-क) – 06
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि शासनाद्वारे मान्यताप्राप्त इमारत पर्यवेक्षणातील (Bulding Supervision) कोर्समध्ये प्रमाणपत्र उत्तीर्ण.

7) छायाचित्रचालक (गट-क) – 01
शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. आणि 02) कोणत्याही शासन मान्यताप्राप्त संस्थेचे फोटोग्राफीचे प्रमाणपत्र असणे आवश्यकः

8) अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित) – 01
शैक्षणिक पात्रता : ज्याने कला शाखेची इतिहास विषयाची “आधुनिक भारताचा इतिहास” या मुख्य विषयासह किमान व्दितीय वर्गातील पदवी धारण केली आहे.

9) फार्शीज्ञात संकलक (गट- क) – 01
शैक्षणिक पात्रता :ज्याने कला शाखेची इतिहास हा मुख्य विषय घेऊन फारसी विषयासह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केलेली आहे.

10) रसायनशास्त्रज्ञ (गट-क) – 01
शैक्षणिक पात्रता : ज्याने विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र या मुख्य विषयासह पदवी धारण केली आहे.

11) संशोधन सहाय्यक (गट- क) – 01
शैक्षणिक पात्रता : ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे.

12) संकलक (गट-क) – 02
शैक्षणिक पात्रता : ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे.

13) सहाय्यक छायाचित्रकार (गट-क)- 01
शैक्षणिक पात्रता : 01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेली विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा किमान दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी. 02) मान्यताप्राप्त संस्थेचे छायाचित्रणातील प्रमाणपत्र किंवा तत्सम अर्हता आवश्यक.

14) ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क) – 01
शैक्षणिक पात्रता : 01) ज्याने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण केली आहे. 02) ज्याने ग्रंथालय शास्त्राची पदविका धारण केली आहे.

15) अभिलेख परिचर (गट-क)- 01
शैक्षणिक पात्रता : ज्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

16) तंत्रज्ञ मदतनीस (गट-क)- 01
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

17) अधिक्षक (गट-ब अराजपत्रित) – 02
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण.

18) सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य) – 02
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण.

19) सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित) – 04
शैक्षणिक पात्रता :अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे.

20) सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका)- 02
शैक्षणिक पात्रता : अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे.

21) टिप्पणी सहायक (गट-क)- 01)
शैक्षणिक पात्रता : पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा : 15 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षे [मागासवर्गीय / आर्थिकदृष्टया दुर्लब घटक – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1000/- रुपये [मागासवर्गीय / आर्थिकदृष्टया दुर्लब घटक/अनाथ / दिव्यांग / माजी सैनिक – 900/- रुपये]

इतका पगार मिळेल?
सहाय्यक अधिक्षक (गट-क) S-13:35400-112400
कनिष्ठ अभियंता (गट-क) S-14:38600-122800
जतन सहायक (गट-क) S-13:35400-112400
तंत्र सहायक (गट-क) S-13:35400-112400
मार्गदर्शक व्याख्याता (गट- क) S-6:19900-63200
उप आवेक्षक (गट-क) S-8:25500-81100
छायाचित्रचालक (गट-क) S-10:29200-92300
अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित) S-14:38600-122800
फार्शीज्ञात संकलक (गट- क) S-13:35400-112400
रसायनशास्त्रज्ञ (गट-क) S-10:29200-92300
संशोधन सहाय्यक (गट- क) S-8:25500-81100
संकलक (गट-क) S-8:25500-81100
सहाय्यक छायाचित्रकार (गट-क) S-8:25500-81100
ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क) S-7:21700-69100
अभिलेख परिचर (गट-क) S-6:19900-63200
तंत्रज्ञ मदतनीस (गट-क) S-6:19900-63200
अधिक्षक (गट-ब अराजपत्रित) S-13:35400-112400
सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य) S-8:25500-81100
सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित) S-14:38600-122800
सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका) S-8:25500-81100
टिप्पणी सहायक (गट-क) S-8:25500-81100

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mtdc.co

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button