महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात ८वी ते १२वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी
MTDC Recruitment 2024 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात टुरिस्ट गाइड प्रोग्राम २०२४-२५ अंतर्गत भरती करण्यात येत असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. १०वी आणि १२वी पास तरुणांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरती संदर्भात जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पदाचे नाव : पर्यटक (Tourist GUIDE)
शैक्षणिक पात्रता : या नोकरीसाठी ८ वी, १०वी आणि १२वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत उमेदवाराला मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलता यायला हवी.
वयोमर्यादा : २१ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
परीक्षा फी : फी नाही
पगार : पात्र उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
निवड पद्धत :
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल पत्ता : resortguide@maharashtratourism.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मफतलाल हाउस, १ ला मजला, एस.टी. पारीख मार्ग, १६९ बॅकबे रिक्लेमेशन्स, चर्चगेट, मुंबई ४००२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : https://www.mtdc.co/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा