MUCBF Recruitment 2024 महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मार्फत ‘कनिष्ठ लिपिक’ पदांसाठी भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 07
रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 मार्च 2024 रोजी 22 ते 35 वर्षे.
परीक्षा फी : ₹944/-
पगार : 10,000/- ते 13,200/-
निवड प्रक्रिया :
ऑफलाईन परीक्षा :
कनिष्ठ लिपिक पदाकरिता १०० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल. बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांमध्ये गणित, इंग्रजी व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौधिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि आर्थिक ज्ञान या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल. तद्नंतर १०० पैकी प्राप्त गुणांचे ९० च्या गुणोत्तरामध्ये रुपांतर करण्यात येईल.
कागदपत्रके पडताळणी:
उमेद्वारास ऑफलाईन परीक्षेतील गुणांच्या उतरत्या क्रमवारीनुसार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रकांची प्राथमिक कागदपत्रके पडताळणीसाठी बोलविण्यात येईल. त्यावेळी उमेद्वाराने मूळ कागदपत्रके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रके पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेद्वारास बँक धोरणाप्रमाणे बँकेकडून मुलाखतीस बोलविण्यात येईल.
मुलाखतः
कनिष्ठ लिपिक पदाकरिता उत्तीर्ण होणाऱ्या उमेद्वारांना बँकेच्या धोरणानुसार भरावयाचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षेचे गुणानुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलविण्यात येईल. मौखिक मुलाखतीकरिता १० गुण (शैक्षणिक पात्रतेकरिता ५ गुण व मौखिक मुलाखतीकरिता ५ गुण) राहतील. मुलाखतीस गैरहजर राहिल्यास संबंधित उमेद्वार अंतिम निवडीस (परीक्षेत उत्तीर्ण झालेला असला तरी) पात्र राहणार नाही.
उमेद्वाराची अंतिम निवड सूची:
उमेद्वाराचे ऑफलाईन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण १०० गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल.
नोकरी ठिकाण: अमरावती
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मार्च 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://mucbf.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा