Mumbai Fire Department Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत अग्निशामक विभागात भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार तब्बल 910 पदे भरण्यात येणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन लाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज भरती प्राक्रिया १३ जानेवारी २०२३ पासून ते ४ फेब्रुवारी २०२३पर्यंत राबविण्यात येत आहे. Mumbai Fire Department Recruitment 2023
एकूण जागा : 910
रिक्त पदाचे नाव – अग्निशामक (Fire Fighter)
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत किमान 50% गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
माजी सैनिकांसाठी – मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण. किंवा उमेदवारांनी माध्यमिक शाळा परीक्षा (इयत्ता 10वी) उत्तीर्ण केलेली असावी आणि भारतीय सैन्यात किमान 15 वर्षांच्या सेवेसह पदवी प्रमाणपत्र असावे.
उमेदवारांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समकक्ष किंवा उच्च परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा (Fire Department Bharti) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता :
उंची :
पुरुष : 172 cm
महिला : 162 cm
वजन : 50 Kg (किलो)
छाती :
साधारण : ८१ सेमी
फुगवून : ८६ सेमी
परीक्षा फी : खुला / अराखीव प्रवर्ग- रु. 944/-
आणि मागासवर्गीय व आदुघ / अनाथ आरक्षण अंतर्गत अर्ज करणारे उमेदवार – रु.590/- इतके भरती प्रक्रीया शुल्क (वस्तू व सेवा कर सहीत) ‘बृहन्मुंबई महानगरपालिका ‘ (Brihanmumbai Municipal Corporation) या नावाने मुंबईत देय असलेला (Payable at Mumbai) डिमांड ड्राफ्ट भरतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्ट नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही व सदर उमेदवारास भरती प्रक्रीयेत समाविष्ट केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मैदानी चाचणी मध्ये असणारे टप्पे
उडी मारणे आणि 800 मीटर रनिंग ही चाळणी प्रक्रिया आहे हे 2 इव्हेंट पास झाल्यावर पुढील मैदानी चाचणी ला सुरवात होतेल
मैदानी चाचणी – पुरुषाकरिता – महिलाकरिता
800 मीटर धावणे : पुरुषाकरिता 3 मिनिट, महिलाकरिता -4 मिनिट
जमिनी पासून ३३ फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली
उतरावे लागेल : पुरुषाकरिता – 40 सेकंद, महिलाकरिता- 60 सेकंद
50 kg वजनाची मानवाकृती खांध्यावर घेऊन ६० मीटर अंतर धावणे : पुरुषाकरिता -40 सेकंद, महिलाकरिता- 45 सेकंद
२० फूट उंची पर्यत रस्सीवर चढणे व उतरणे: पुरुषाकरिता -होये, महिलाकरिता -नाही
२० पूल अप्स काढणे: पुरुषाकरिता -होये, महिलाकरिता -नाही
गोळा फेक (4 Kg ) : पुरुषाकरिता -नाही, महिलाकरिता -होये
लांब उडी : पुरुषाकरिता – नाही, महिलाकरिता -होये
पुश अप : पुरुषाकरिता -नाही, महिलाकरिता -होये
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 फेब्रुवारी 2023
भरतीचे ठिकाण : लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – 400103.
अधिकृत संकेतस्थळ : mahafireservice.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा