⁠  ⁠

खुशखबर..! मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदाच्या 1100 जागांसाठी लवकरच भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी मिळू शकतो. ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेत भरती निघणार आहेत. महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कनिष्ठ लिपिकांची ११०० पदांची भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जाहिरात महिनाभरात सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

२ हजार कनिष्ठ लिपिक पदांची भरती मुंबई महानगरपालिकेत होणार आहे. भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता पाहता संपूर्ण राज्यात या भरती प्रक्रियेसाठीची केंद्र उपलब्ध करून देता येतील का? याबाबतची चाचपणी सध्या महानगरपालिका स्तरावर सुरू आहे.

मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी ११०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी त्रयस्थ संस्थेला हे काम देण्यात आले आहे. या संस्थेसोबत महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचा करारही झाला आहे. आयबीपीएस आणि टीसीएस या संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत दरवर्षी रिक्त होणाच्या पदांनुसार लिपिक पदाची सुमारे ४० टक्के पदे ही रिक्त आहेत. त्यासाठीच दोन टप्प्यात भरती प्रक्रिया राबवण्याचे पालिकेकडून नियोजन करण्यात आले आहे.

Share This Article