Mumbai Port Trust Recruitment 2022 : मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust MPT) मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणार्थी (कायदेशीर) या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 असणार आहे.
एकूण जागा : १८
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी कायदेशीर (Trainee Legal)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Law Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.फायनल इयरला असेलेले उमेदवारही या पदभरतीसाठी अप्लाय करू शकणार आहेत.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
पगार : 25,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१.
अर्ज करण्यासाठीचा तारीख – 01 ऑगस्ट 2022
अधिकृत संकेतस्थळ : mumbaiport.gov.in
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा