---Advertisement---

सलग चारवेळा अपयश, जिद्द व चिकाटीच्या बळावर मुरलीधरची पोलिस दलात गगनभरारी!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

आपले स्वप्न ठाम असेल तर यशाचा मार्ग हा मोकळा होतो. तसेच जिल्हा परिषदेमध्ये शिकलेल्या शेतकरी पुत्र मुरलीधरला सैन्य, एसएससी जीडी व पोलिस भरती मध्ये सलग चार वेळा यशाने हुलकावणी दिली. जिद्द व चिकाटीच्या बळावर राज्य राखीव पोलिस दलाच्या भरतीमध्ये यशाला गवसणी घातली आहे.

सिंदखेड येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुरलीधर अंबादास पवार. तो लहानपणी शेतकरी कुटुंबात जडणघडण झालेल्या आणि वाढलेला लेक. त्याचे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. तर पुढील शिक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात घेतले. पुढे त्याने बोदवड येथे अकरावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे त्याने पदवी शिक्षण पूर्ण करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. पण परिस्थिती बेताची होती. कोणतेही मार्गदर्शन नव्हते. तरी देखील मुरलीधरने गावातील आई तुळजाभवानी वाचनालयात अभ्यासाची कास धरली. त्यानंतर शासकीय नोकरीचे ध्येय उराशी बाळगून त्याने सैन्य भरती व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.

पहिले त्याने २०१७ मध्ये भारतीय सैन्य भरतीसाठी प्रयत्न केला. त्यानंतर त्याने २०१८ मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे कॉन्स्टेबल (एसएससी जीडी) भरती मध्ये मेडिकल पर्यंत प्रयत्न केला. त्यात काही यश आले नाही. पुढे त्याने पोलिस भरतीची तयारी सुरू केली पण खी परीक्षा उत्तीर्ण होऊनही कट ऑफ लिस्ट मध्ये दोन गुणांनी त्याची निवड हुकली. यात त्यांनी २०२१ मध्ये जळगाव व मुंबई येथे पोलिस भरतीमध्ये नशीब आजमावले. त्याने पोलिस भरतीचे मैदान गाजवले. पण अपयशाने हरला नाही तर पुन्हा तयारीला सुरुवात केली आणि त्यात २०२३ मध्ये त्याला यश मिळाले. त्याची पोलिस दलात निवड झाली. सध्या त्याची अहमदनगर येथे एसआरपीएफ मध्ये निवड झाली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts