⁠  ⁠

NABARD मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! या पदांवर निघाली भरती

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 1 Min Read
1 Min Read

NABARD Recruitment 2024 : जर तुम्ही बँकेत ऑफिसरची नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. NABARD-Bankers Institute of Rural Development (NABARD-BIRD) ने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले कोणतेही उमेदवार nabard.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. नाबार्डच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.३० एप्रिल किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता.

पदाचे नाव :
नाबार्डच्या या भरतीद्वारे संशोधन अधिकारी पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संशोधन संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे. त्यानंतरच ते या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र मानले जातील.

वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ३१-०३-२०२४ रोजी ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावी. याशिवाय, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत दिली जाईल.

इतका पगार मिळेल :
नाबार्डच्या या भरती अंतर्गत निवडलेल्या कोणत्याही उमेदवाराला 100,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अशा प्रकारे नाबार्डमध्ये निवड होईल
अधिकृत अधिसूचनेनुसार, नाबार्डच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी क्षमता चाचणी, डेटा विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशन असेसमेंट, पॉवर-पॉइंट प्रेझेंटेशन आणि वैयक्तिक मुलाखत या आधारे केली जाईल.
अधिकृत संकेतस्थळ : nabard.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article
Leave a comment