⁠  ⁠

बँकेत पदवी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी.. या तारखेपर्यंत करा अर्ज

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नैनिताल बँकेने लिपिक आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाली आहे. उमेदवार 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट nainitalbank.co.in द्वारे अर्ज करू शकतात.

एकूण 100 रिक्त पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.

पदाचे नाव आणि पदसंख्या :

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – ५० पदे
लिपिक – ५० पदे

शैक्षणिक पात्रता
मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवार ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच, उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असावे.

अर्ज फी
या पदांसाठी (Nainital Bank Bharti 2022) अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

निवड प्रक्रिया
लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

इतका मिळेल पगार?

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी रु. 30,000/- दरमहा
लिपिक रु. 17900-47920 अधिक लागू भत्ते

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article