Navy Agniveer Bharti 2022 : भारतीय नौदलात अग्निवीर SSR भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्ज प्रक्रियेनंतर लेखी चाचणी, शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. भारतीय सशस्त्र दलांमध्ये वैद्यकीय चाचणी ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. उमेदवारांना शारीरिक मानके आणि वैद्यकीय चाचण्यांचे पूर्व ज्ञान असणे आवश्यक आहे. या भरतीअंतर्गत २,८०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२२ आहे.
एकूण जागा : २८००
पदाचे नाव : अग्निवीर
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून १०+२ परीक्षेत गणित आणि भौतिकशास्त्र आणि किमान एक विषय – रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान उत्तीर्ण
वयाची अट : जन्म ०१ नोव्हेंबर १९९९ ते ३० एप्रिल २००५ मध्ये असावा.
वैद्यकीय फिटनेस चाचणी
शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना INS चिल्का, ओडिशा येथे वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल. जे उमेदवार वैद्यकीय चाचणीत तंदुरुस्त आढळतील त्यांना प्रवेश दिला जाईल. वैद्यकीय चाचणीत अयोग्य घोषित केलेले उमेदवार 21 दिवसांच्या आत INHS निर्वाणी/INHS कल्याणी यांच्याकडे वैद्यकीय चाचणीसाठी पुन्हा अपील करू शकतात.
वैद्यकीय मानक
वैद्यकीय मानकांनुसार लष्करी डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केली जाईल.
लिंग- बाह्य शारीरिक चाचणी दरम्यान, उमेदवारामध्ये विरुद्ध लिंगाची वैशिष्ट्ये ठळकपणे आढळल्यास, त्याला अयोग्य घोषित केले जाईल. याशिवाय लिंग बदलाची शस्त्रक्रिया झाली असली तरी ती अनफिट घोषित केली जाईल.
गर्भधारणा- वैद्यकीय चाचणीदरम्यान महिला उमेदवार गर्भवती असल्याचे आढळल्यास तिला अपात्र ठरवले जाईल. तसेच त्यांची उमेदवारीही रद्द होणार आहे. रिपोर्टिंगच्या वेळी किंवा प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत उमेदवार गर्भवती असू नये. प्रशिक्षणादरम्यान उमेदवार गर्भवती असल्याचे आढळून आले तरी, उमेदवारी रद्द केली जाईल.
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा