---Advertisement---

NCERT मध्ये सरकारी नोकरीची संधी..! 347 पदांवर भरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

NCERT Recruitment 2023 नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने विविध पदे भरण्यासाठी भरती काढली आहे. यासाठीची NCERT ने शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध केली असून या भरतीची जाहिरात 29 एप्रिल 2023 ते 06 मे 2023 या कालावधीत एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये देखील प्रसिद्ध केली जाईल. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. 20 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकाल.

एकूण रिक्त जागा : 347

---Advertisement---

NCERT च्या नवीन 347 रिक्त पदांअंतर्गत 195 पदे अनारक्षित आहेत. 25 पदे अनुसूचित जातीसाठी, 16 पदे अनुसूचित जमातीसाठी, 89 पदे OBC आणि 22 पदे EWS प्रवर्गासाठी राखीव आहेत.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
स्तर-10-12 पदांसाठी 33 रिक्त जागा आहेत. स्तर 6-8 पर्यंतच्या पदांसाठी 99, स्तर 2-5 पर्यंतच्या पदांसाठी 215 रिक्त जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता : अधिसूचना PDF मध्ये दिलेल्या लेव्हल 2-12 पदांसाठी पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार NCERT भरती 2023 साठी अर्ज करण्यास पात्र असतील.

निवड प्रक्रिया :
पात्र अर्जदारांची निवड कौशल्य चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ही पदे नवी दिल्ली येथील NCERT मुख्यालय, NIE आणि CIET, भोपाळ येथील PSSCIV, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँग येथील पाच RIE आणि अहमदाबाद, बंगलोर, गुवाहाटी आणि कोलकाता येथील प्रकाशन विभागाच्या RPDC साठी आहेत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची प्रक्रिया : 29 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2023

अधिकृत वेबसाईट : www.ncert.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now