⁠  ⁠

मराठी मुलीची अमेरिकन शेअर बाजारात बाजी, नेहा नारखेडे झाली अब्जाधीश

Chetan Patil
By Chetan Patil 6 Min Read
6 Min Read

अमेरिकन शेअर बाजारात IPO आल्यानंतर पहिल्याच दिवशी जोरदार मुसंडी मारणाऱ्या Confluent कंपनीची जोरदार चर्चा आहे. पण आपल्यासाठी याहून मोठी बातमी आहे. या कंपनीची सहसंस्थापक आहे नेहा नारखेडे – पुण्यात वाढलेली पण मूळ सावदा येथील असलेली एक मराठी तरुणी. स्वकर्तृत्वावर मोठी झालेल्या टेक्नोक्रॅट किंवा तंत्रज्ञान उद्योजिकेची प्रेरणादायी कथा…

कॅलिफोर्नियातली कॉन्फ्लुएंट (Confluent IPO) ही कंपनी अमेरिकेतल्या नॅस्डॅक (Nasdaq) या शेअर बाजारात गुरुवारी (24 जून) लिस्ट झाली. 36 डॉलर्स प्रति शेअर या मूल्यासह दाखल झालेल्या आयपीओद्वारे (IPO) 828 दशलक्ष डॉलर उभे केले गेले. त्यामुळे कंपनीचं मूल्यांकन 9.1 अब्ज डॉलर एवढं झालं. शेअर बाजाराच्या पहिल्याच दिवसाच्या शेवटी कॉन्फ्लुएंटच्या शेअर्सच्या मूल्यामध्ये जवळपास 25 टक्के वाढ झाली आणि ते मूल्य 45.02 डॉलर प्रति शेअर एवढं झालं. अमेरिकन शेअर बाजारात पहिल्याच दिवशी IPO आल्यानंतर हा एवढा भाव मिळवल्याने Confluent कंपनीची जोरदार चर्चा आहे. पण आपल्यासाठी याहून मोठी बातमी आहे. या कंपनीची सहसंस्थापक आहे नेहा नारखेडे – पुण्यात वाढलेली एक मराठी तरुणी. कुठलीही पार्श्वभूमी नसताना अमेरिकेत शिकायला जाऊन तिथे स्वकर्तृत्वावर मोठी झालेल्या टेक्नोक्रॅट किंवा तंत्रज्ञान उद्योजिकेची प्रेरणादायी यशाची खरी बातमी आहे.
त्यामुळे कंपनीचं भांडवली बाजारमूल्य 11.4 अब्ज डॉलर एवढं झालं. या घटनेचं महत्त्व काय, हे सांगणारी गोष्ट पुढेच आहे. या घटनेमुळे या कंपनीच्या तीन संस्थापकांपैकी दोन संस्थापक अब्जाधीश झाले आणि तिसरी संस्थापक अब्जाधीश होण्याच्या वाटेवर आहे. ती तिसरी संस्थापक एक मराठी मुलगी आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्या मुलीचं नाव आहे नेहा नारखेडे (Neha Narkhede). कंपनी स्थापन केल्यापासून सात-आठ वर्षांत हे यश त्यांना मिळालं आहे.

दर सेकंदाला 67 लाख रुपये कमवतात Elon Musk; लहानपणीच केलेली व्यवसायाला सुरुवात
‘फोर्ब्ज’ने दिलेल्या वृत्तानुसार, जय क्रेप्स, नेहा नारखेडे आणि जून राव हे तिघे लिंक्डइन (LinkedIn) या प्रसिद्ध आणि व्यापक प्रोफेशनल नेटवर्क कंपनीचे कर्मचारी होते. लिंक्डइनवर प्रचंड प्रमाणात येणारे मेसेजेस, नेटवर्क रिक्वेस्ट्स आणि प्रोफाइल व्ह्यूज आदींचं व्यवस्थापन सोपं होण्याच्या दृष्टीने या तिघांनी क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित असलेलं एक टेक्निकल टूल 2011मध्ये विकसित केलं. एवढ्या प्रचंड प्रमाणात तयार होणाऱ्या डेटाचं व्यवस्थापन (Data Management) ही केवळ Linkedin चीच नव्हे, तर अन्य कंपन्यांपुढचीही समस्या असू शकते, असा विचार त्या तिघांनी केला. त्यातून त्यांनी क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित असलेलं हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर (Open Source Software) विकसित केलं आणि 2014मध्ये त्याकरिता कॉन्फ्लुएंट नावाची कंपनी उभारली. नेहा नारखेडे ही त्या कंपनीची सहसंस्थापक आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (CTO) म्हणजेच तंत्रज्ञानविषयक मुख्य अधिकारी आहे.

‘सीएनबीसी डॉट कॉम’ने काही कालावधीपूर्वी नेहाचा प्रेरक प्रवास उलगडणारा लेख प्रसिद्ध केला होता. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या क्षेत्रांत महिलांना कर्तृत्व गाजवणं अवघड असतं. कारण त्यांना संधीच मिळणं कठीण असल्याने स्वतःला सिद्ध करून दाखवणं त्याहून अवघड असतं. तंत्रज्ञान हे असंच पुरुषांचं वर्चस्व असलेलं क्षेत्र.

अभ्यासासाठी Internet कसा कराल वापर; IAS ऑफिसर अंशुमन राज यांचा यशाचा मूलमंत्र त्यात एवढी उत्तुंग कामगिरी केलेल्या नेहाचं कौतुक करायलाच हवं. 2019मध्ये ‘अमेरिकेतल्या सर्वांत श्रीमंत सेल्फ-मेड महिलां’च्या ‘फोर्ब्ज’ने प्रकाशित केलेल्या यादीत नेहाचं नाव प्रकाशित झालं होतं. तेव्हा ती लक्षाधीश होती. 2021मध्ये ती अब्जाधीश होण्याच्या वाटेवर आहे. तिची वाटचाल किती प्रेरक आहे आणि कुठल्या दिशेने चालू आहे, हे यावरून आपल्या लक्षात येतं.

पुण्याची मुलगी कशी झाली अमेरिकेतली कोट्यधीश
नेहाला तिच्या वयाच्या आठव्या वर्षी पहिल्यांदा कम्प्युटर हाताळायला मिळाला. तेव्हा ती भारतातच होती. तेव्हापासून तिने तंत्रज्ञान क्षेत्राचा ध्यास घेतला आणि त्यात अभ्यास करत पुढे जात राहिली. 2006मध्ये जॉर्जिया युनिव्हर्सिटीतून कम्प्युटर सायन्स शाखेतून पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेण्यासाठी ती अमेरिकेत आली.

नांदेडच्या शेतकरी कन्येची गगन भरारी;14 व्या वर्षीच अमेरिकेत केलं विमानउड्डाण
त्यानंतर तिच्या चांगल्या कामगिरीमुळे तिची निवड झाली ते लिंक्डइन या जगड्व्याळ प्रोफेशनल नेटवर्क कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून. तिथे काम करतानाच अन्य दोन सहकाऱ्यांसोबत तिने कॉन्फ्लुएंट कंपनीची स्थापना केली आणि त्या कंपनीची वाटचाल कशी चालू आहे, याबद्दलची ताजी घडामोड आपण वाचलीच.

स्त्रियांनी कधीतरी ‘बहिरं’ व्हायला हरकत नाही
कौशल्य आणि आपल्या विषयाबद्दलचं मूलभूत, सखोल ज्ञान तर अत्यावश्यक आहेच; पण तेवढंच असणं पुरेसं नसतं. ‘पुरुषी वर्चस्व (Male Dominated) असलेल्या क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर टीका, क्षमतेबद्दल घेतली जाणारी शंका यांकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. अडथळे काचेच्या भिंतीसारखे असतील, तर ते फोडून पुढे जायचा प्रयत्न करायचा. अडथळे दगडासारखे असतील, तर ते फोडण्यात वेळ न घालवता, त्याकडे दुर्लक्ष करून आपली वाटचाल सुरू ठेवायची. त्यासाठी जिद्द, टिकून राहण्याची हिंमत आणि कणखरपणा लागतो,’ असं नेहाने पूर्वीच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. ‘कधीतरी सरळ टोमण्यांकडे, टीकेकडे काणाडोळा करणं, आपल्याला ऐकूनच आलं नाहीये असं वावरणं म्हणजेच थोडं जाणीवपूर्वक बहिरं होणं आपल्याच हिताचं असतं,’ असा सल्ला त्या करिअर करू इच्छिणाऱ्या स्त्रियांना देतात.

अगदी मोजक्या शब्दांत सांगितलेला हा संदेश खूपच महत्त्वाचा आहे. कारण नवं काही करू पाहणाऱ्या महिलांना होणाऱ्या विरोधाला प्रत्युत्तर देण्यातच अनेक महिलांची क्षमता आणि वेळ खर्ची पडतो आणि मग त्या स्वतःला सिद्ध करू शकत नाहीत. अशा महिलांनी आणि सर्वांनीच नेहाचा हा संदेश लक्षात घेणं आवश्यक आहे.

मुंबईत अवघ्या 80 रुपयात झाली ब्रॅन्डची सुरुवात; आता Turnover पोहोचला 800 कोटींवर ‘तंत्रज्ञान क्षेत्रात (Technology Sector) अजूनही महिलांना फक्त अनुभवाच्या आधारे जोखलं जातं. पुरुषांचं मूल्यमापन (Evaluation) मात्र क्षमतेच्या आधारे केलं जातं. त्यामुळे तुम्ही मागितली नाही, तर तुम्हाला दीर्घ काळापर्यंतही संधी दिली जाणार नाही. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी थेट संधी मागणं हेच आवश्यक आहे,’ असंही नेहा सांगते. स्वतःला जाणीवपूर्वक घडवलेल्या नेहाचा हा प्रवास निश्चितच भारतीयांसाठी, मराठी माणसांसाठी आणि खास करून मराठी मुलींसाठी प्रेरणादायी असाच आहे. व यामुळे सावदा शहराचे नाव पुन्हा एकदा प्रकाश झोतात आहे आहे

Share This Article