---Advertisement---

MPSC मार्फत होणाऱ्या लिपीक-टंकलेखक पदांसाठीच्या भरतीचा नवीन GR

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट-क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे भरण्यात येणार असून शासन निर्णयातील तरतूदी व सूचना विचारात घेवून विहित नमुन्यातील सविस्तर मागणीपत्र शासनास सादर करण्याबाबत संदर्भाधीन क्र. 2 येथील शासन पत्रान्वये यापूर्वी कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि.1 जानेवारी 2023 ते दि. 31 डिसेंबर 2023 या कालावधीत नियोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाने उपलब्ध करुन दिले आहे. त्यानुसार लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदे “महाराष्ट्र राजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३” मधून भरावयाचे प्रस्तावित असून, त्याकरीता जाहिरात (MPSC Recruitment 2023) जानेवारी, २०२३ च्या पहिल्या आठवड्यात प्रसिध्द होणार असल्याने त्यासंबंधातील पदांचे मागणीपत्र पाठवितांना सद्या रिक्त असलेली पदे व नजिकच्या काळात पदोन्नती / सेवानिवृत्ती इत्यादी बाबींमूळे रिक्त होणारी पदे विचारांत घेण्याचे आयोगाने कळविले आहे.

---Advertisement---

विहित दिनांकापर्यंत परिपूर्ण लिपिक-टंकलेखक (महसूल सहाय्यक) संवर्गाचे मागणीपत्र शासनास प्राप्त न झाल्यास सन २०२३ मध्ये संबंधित कार्यालयाची पदे भरावयाची नाहीत, असे (MPSC Bharti 2023) समजण्यात येईल. तसेच स्पर्धा परीक्षांच्या सन २०२३ च्या अंदाजित वेळापत्रकामध्ये संबंधित कार्यालायातील रिक्त पदांचा समावेश करण्यात येणार नाही. परिणामी सदर संवर्ग /पदावरील भरतीसाठी सन २०२३ मध्ये आयोगास भरतीप्रक्रीया राबविणे शक्य होणार नाही. याची नोंद घ्यावी, ही विनंती.

भरतीचा GR पाहण्यासाठी येथे क्लीक करा :– GR

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now