NIACL Assistant Bharti 2025 : सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये भरती होणार आहे. सहाय्यक पदासाठी ही भरती होणार आहे. एकूण 500 जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 17 डिसेंबर पासून सुरु होणार आहे, तर 1 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
रिक्त पदाचे नाव : सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना त्यांच्या प्रदेशातील प्रादेशिक भाषेचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा : २१ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
परीक्षा फी :
सामान्य/ओबीसी : 850/-
SC/ST आणि PwD रु. 100/- (फक्त सूचना शुल्क)
पगार : असिस्टंट पदासाठी उमेदवारांना ४० हजार रुपये पगार मिळणार आहे.
निवड पद्धत : या नोकरीसाठी उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परिक्षेद्वारे केली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही new.india.co.in या वेबसाइटवर जा. त्यानंतर Apply Online वर क्लिक करा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरा.