ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; तब्बल इतका पगार मिळेल..
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये भरती निघाली आहे. याभरतीसाठी कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाहीय . या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यासंदर्भात ई-मेल पाठवला जाईल.
ओएनजीसीमध्ये कंसल्टंट पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. ओएनजीसीमध्ये भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर आहे. जर तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.
ओएनजीसीमध्ये कंसल्टंट, अॅडव्हायझर इंटरप्रिटेशन जियोलॉजिस्ट विथ ऑपरेशन जियोलॉजिस्ट या पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदावाराने M.Sc/M.ScTech/Mtech पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत उमेदवारांना २० वर्षांचा अनुभव असायवा हवा.
शैक्षणिक पात्रता :
कंसल्टंट/अॅडवायझर इंटरप्रिटेश जियोफिजिक्स पदासाठी उमेदावाराने M.ScTech/M.Tech पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत उमेदवाराला २० वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा.
इतका पगार मिळेल?
या नोकरीसाठी उमेदवाराला १,२०,००० रुपये ते १,२७,५०० रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ६४ वयापर्यंत उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.