PCMC Recruitment 2022
PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune) मध्ये सहाय्यक शिक्षक पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ११ जून २०२२ रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.
एकूण जागा : 140 जागा
पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक (मराठी व उर्दू)
पद १ : सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) : 117
शैक्षणिक पात्रता : B.Sc,B.Ed/B.A, B.Ed/BP.Ed
बी.एस्सी.बी.एड : ४७
बी.ए.बी.एड. – मराठी विषय : २७
बी.ए.बी.एड. – हिंदी विषय : १४
बी.ए.बी.एड. – इंग्रजी विषय : १४
बी.ए.बी.एड. – इतिहास विषय : ०५
बी.ए.बी.एड. – भूगोल विषय : ०२
बी.पी.एड. ( क्रीडा प्रशिक्षक ) : ०८
पद २ : सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) : २३
शैक्षणिक पात्रता : B.Sc,B.Ed/B.A, B.Ed/BP.Ed
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
परीक्षा शुल्क: फी नाही.
अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता: माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे-35
अर्ज सादर करण्याची तारीख: 11 जून 2022 (10:30 AM ते 05:30 PM)
अटी / शर्ती :
१) सदर पदाची निवड (सहाय्यक शिक्षक) ही पुर्णपणे तात्पुरत्या व हंगामी स्वरूपाची आहे. उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार सांगता येणार नाही. सदरची नेमणूक शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ याकरिता आवश्यकतेनुसार राहिल.
२) एकत्रित मानधन शिक्षकांची नेमणुक ही आदेशाचे दिनांकापासुन सहा महीने राहील, त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कागमपदी नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही. तसेच नेमणुकी संदर्भात न्यायालयात दाद मागणार नाही. याबाबतचे हमीपत्र सादर करावे लागेल.
३) एकत्रित मानधन रक्कम रुपये २४,०००/- ( अक्षरी रक्कम रुपये चोवीस हजार रूपये फक्त) एवढे राहील उमेदवारांना शालेय सुट्या वगळुन इतर सुख्या राहणार नाहीत. दिवाळी उन्हाळी सुट्टीचे वेतन देय असणार नाही.
४) उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक व व्यवसायिक अर्हताविषयक प्रमाणपत्र पदविका बी. एड. पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक, जात प्रमाणपत्र, अनुभव दाखला इत्यादी कागदपत्राच्या सत्य प्रती सादर कराव्यात.
५) ज्या दिवशी माध्यमिक शिक्षण विभागास सदर सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशी शिवाय सदर उमेदवारांची सेवा संपृष्टात आणण्यात येईल या संबधीचे सर्व अधिकार माध्यमिक शिक्षण विभागाने राखुन ठेवले आहेत.
अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
जाहिरात पहा : येथे क्लिक करा