खरंतर, आपली जिद्द हीच माणसाला नव्याने सुरूवात करायला पाठबळ देते.स्वाती गुप्ता ही महत्त्वाकांक्षी मुलगी.स्वाती गुप्ता यांचे वडील चित्रा कुमार हे एक शिक्षक आहेत.आई गृहिणी आहे. तिला दोन भाऊ आहेत, त्यापैकी एक भाऊ डॉक्टर आहे.तिने बारावी विज्ञान शाखेतून पूर्ण केली. तर टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स केले आहे.
सुरुवातीच्या काळात पीसीएस/यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करणे त्यांना खूप कठीण गेले, परंतु नंतर ते समजून घेण्यासाठी आणि परीक्षेची उत्तम तयारी करण्यासाठी त्यांनी दिल्लीतून कोचिंग घेेतले. तिच्या घरच्यांनी तिला ज्यांनी तिला केवळ चांगले शिक्षण मिळण्यासाठीच मदत केली नाही तर तिला अधिकारी होण्यासाठीदेखील प्रेरित केले.सुरूवातीला तिने युपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले होते. पण ती मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती, परंतु मुलाखतीत त्यांची निवड झाली नाही. त्यानंतर त्यांनी २०१७ आणि २०१८ मध्ये दोनदा उत्तर प्रदेश PCS क्लिअर केली.
त्यांनी कॉम्प्युटर सायन्स परीक्षा, IB असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर परीक्षा, राजस्थान लोकसेवा आयोग प्रशासकीय सेवा परीक्षा, मंडी निरीक्षक परीक्षा आणि (PCS) फॉरेस्ट ऑफिसर परीक्षा उत्तीर्ण केली.सध्या पंचायती राज विभागात कार्य अधिकारी म्हणून तैनात आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपी पीसीएस परीक्षा उत्तीर्ण केली.