पुणे महानगरपालिकामध्ये भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पदांनुसार पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जुलै २०२२ आहे.
एकूण जागा : १०४
पदाचे नाव : माध्यमिक प्राथमिक शिक्षक
शैक्षणिक पात्रता :
०१) इयत्ता १ ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
०२) इयत्ता १ ली ते १० वीपर्यंत इंग्रजी, १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
०३) इयत्ता १ ली ते १० वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
०४) इयत्ता १ ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
०५) वर नमूद उल्लेखित सर्व उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी/सीटीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक राहील. टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय, शिवाजीनगर, पुणे – ०५.
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा