दहावी आणि बारावी उत्तीर्णांसाठी एक संधी चालून आली आहे. पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र (Punjab National Bank) पुणे येथे एकूण ६० पदांची भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PNB Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिपाई, सफाई कामगार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्यापत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Bank Jobs in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२२ असणार आहे.
एकूण जागा : ६०
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) शिपाई/ Peon – १९ पदे
शैक्षणिक पात्रता : ०१) केवळ १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक).
२) सफाई कामगार/ Sweepers – ४१ पदे
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही ०२) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
वयो मर्यादा :
०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
निवड प्रक्रिया :
शिपाई पदासाठी निवड ही त्या उमेदवाराने १०वी इयत्तेत (वेटेज ४०%) आणि १२ वी इयत्तेत (वेटेज ६०%) किती टक्के गुण मिळवले आहेत त्या आधारे करण्यात येईल. गुणांची टक्केवारी करताना दोन दशांशापर्यंत गणना करण्यात येईल. वर दिलेल्या गणनेनुसार ज्या उमेदवारांना जास्त टक्के मिळाले असतील त्यांचा गुणवत्ता यादीत कमी टक्के असलेल्या उमेदवारांच्या वर क्रमांक लागेल.
इतका मिळेल पगार :
१) शिपाई : वेतन १४,५००/- दरमहा अधिक दैनदिन भत्ता, घरभाडे भत्ता, वाहन भत्ता व विशेष भत्ता
२) सफाई कामगार : ४८३३
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ फेब्रुवारी २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास विभाग, पंजाब नॅशनल बँक, मंडळ कार्यालय ९, मोलेदिना रोड, आरोरा टॉवर्स, कॅम्प, पुणे – ४११००१.
अधिकृत संकेतस्थळ : www.pnbindia.in
जाहिरात – शिपाई (Notification) : येथे क्लीक करा
जाहिरात – सफाई कर्मचारी (Notification) : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- मुंबई कस्टम्स मार्फत विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती
- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांच्या 526 जागांवर भरती
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 50 जागांवर भरती; वाचा पात्रता?
- 10वी-12वी अपयश; मात्र यूपीएससी परीक्षेत पाहिल्यात प्रयत्नात मिळविले यश
- नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. मार्फत विविध पदासाठी भरती