आपला संघर्ष हीच आपल्या जगण्याची गोष्ट असते. तशीच गोष्ट ही हर्षल आणि भाग्यश्री पालांदे हे लहानपणापासून दोघेही भावंडं हुशार होते. पण आयुष्यात अनेक अडचणी आल्या. वाईट काळात सगळ्यांनी साथ सोडली, पण आईवडील खंबीरपणे सोबत होते. आई – वडिलांचे सोबत असणं हिच जगातली सर्वात मोठी ताकद होती.पहाटे चार वाजता उठून गोठा साफ करून म्हशींचे दूध काढून सहा वाजेपर्यंत दोघे भाऊ बहीण हे दूध नागोठण्यामध्ये विकून त्यानंतर भरतीच्या क्लाससाठी २८ किलोमीटरचा प्रवास करून जात.
सकाळी ग्राऊंड, लेक्चर व लॅब हे सगळं करून सायंकाळी सहा वाजेपर्यंत घरी पोहचत. सगळी काम उरकून अभ्यास करायचे. शेतात पण सगळी काम करायचे. मनात फक्त एकच गोष्ट होती भरती व्हायचे अन आपला आईबापाच नाव छातीवर घेऊन फिरायचं.चारही बहिणी आईवडील, अकडमीचे सर आणि मित्रपरिवार यांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी दिवस रात्र मेहनत केली. पोलीस भरतीचा प्रवास सुरु झाला. मात्र जबाबदाऱ्या संपल्या नव्हत्या. शेती व घरचा दुधाचा धंदा सांभाळून सगळं करायचं होत. आम्ही दोघांनी ठाम निर्णय घेतला होता
भाग्यश्री पालांदे रायगड पोलीस दलात निवड झाली. तिच्या कष्टाचं चीज झालं. हर्षलचा अनुक्रमे 1 व 2 मार्क्सनी वेटिंग ला राहिलो. आपल्या बहिणीच्या खुशीत तो देखील खूप खुश होता.पुढे त्याची देखील ठाणे पोलीस दलात वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी निवड झाली. त्याच्या आयुष्यातील ते पहिलं यश होत. त्यांचा २०२१ला चालू केलेला स्पर्धा परीक्षेचा प्रवास अखेर २०२४ ला संपला.त्यांच्या संघर्षाच्या काळात अनेक अडचणी आल्या परंतू हार मानली नाही. सर्व संकटांवर पुरून उरले. त्यामुळे त्यांची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.