⁠  ⁠

अखेर, अंगावर अभिमानाची वर्दी ; पूजा टाव्हरे हीची पोलिस कॉन्स्टेबलपदी निवड !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

सामान्य शेतकरी व दुग्ध व्यवसाय करणाऱ्याची लेक पोलिस कॉन्स्टेबलपदी झाल्यावर अनेकांना कळत – नकळतपणे प्रेरणा मिळते. पूजा टाव्हरे ही निरगुडसर गावची सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कन्या आई-वडील कष्टातून चारही मुलांचं शिक्षण मोठ्या कष्टातून पूर्ण करत असून, त्यातून पहिलं स्वप्न वडिलांचं पूजाने सत्यात उतरविले आहे. मोठी मुलगी पूजा नुकतीच पोलीस दलास दाखल झाली आहे.

त्यामागे अजून दोन मुली नर्सिंग कोर्सचे शिक्षण घेत आहे. तर एक मुलगा आयटीआय कोर्स शिक्षण घेत आहे. तिच्या वडिलांचा दुग्ध व्यवसाय असून ते शेती देखील बघतात. पूजाचे शालेय शिक्षण हे गावातच झाले. मग तिचे पुढील शिक्षण घेत असताना पोलिस भरतीची तयारी सुरू केली. दररोजचा मैदानी सराव, अहोरात्र अभ्यास आणि सोबत असणारी चिकाटी…आर्थिक परिस्थिती बेताची होती त्यामुळे क्लास लावणे तर शक्य नव्हतेच.

तिने कुठलाही क्लास न लावता वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मोठ्या जिद्दीने रात्र – दिवस अभ्यास केला. त्यांची शेती अवघी ३५ गुंठे, फक्त दुग्ध व्यवसाय आणि मुलीला पोलीस बनवायचे स्वप्न बाळगले आणि ते पूर्ण झाले. ठाणे शहर पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड झाली आहे. आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मुलीची जिद्द अनेकांना प्रेरणादायी आहे.

Share This Article