---Advertisement---

10वी पाससाठी खुशखबर : भारतीय डाक विभागामध्ये निघाली भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Post Office Recruitment 2025 : भारतीय डाक विभागामध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे.

स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेत २५ पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२५ आहे. मुदतीपूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

स्टाफ ड्रायव्हर पदासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये भरती केली जाणार आहे. मध्य क्षेत्रात १ पदासाठी भरती केली जाणार आहे. दक्षिण भागात ४ पदांसाठी, पश्चिम भागात ५ पदांसाठी, चेन्नईत १५ पदांसाठी अशी एकूण २५ जागांसाठी भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता :
भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत हलक्या आणि वजनदार वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावी.
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला १९९०० रुपये पगार दिला जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : या नोकरीसाठी अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रे ऑफिस ऑफ सिनियर मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, नंबर ३७, ग्रीम्स रोड, चेन्नई ६००००६ येथे पाठवायचा आहे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now