श्रीकांत झंवर याला लहानपणापासून सरकारी अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी, कठोर परिश्रम, तयारी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यानंतर निश्चित यश मिळते, हे यशाचे गमक समजल्यावर त्यांने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
सुरवातीला सरकारी परीक्षेच्या माध्यमातून पास होऊन तो तलाठी झाला. मात्र लॉकडाऊनमध्ये सरकारी नियुत्यांवर स्थगिती असल्याकारणाने त्याची तलाठी म्हणून नुकतीच कोरेगाव जि. सातारा येथे नियुक्ती करण्यात आली. दरम्यानच्या काळात त्याची भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICAR मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत अखिल भारतात २० वे रँक मिळवून Technician Researcher ह्या पदी निवड झाली. मात्र अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगल्यामुळे त्याचे यावर समाधान झाले नाही.
प्रदिप झंवर हा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मारवाडी गल्ली येथील रहिवाशी आहेत.त्यांचे वडील पिग्मी एजन्ट म्हणून तसेच डाकघर मध्ये विविध ग्राहकांची आर.डी जमा करणे आणि एलआयसी मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून ते काम करतात. परिस्थिती अनुकूल नसली तरी अभ्यास सखोल करून श्रीकांत याची कामगार अधिकारी (राजपत्रित अधिकारी) पदावर निवड झाली आहे.