---Advertisement---

मूळ जळगावची असलेली नेत्रहीन प्रांजल बनली IAS अधिकारी ; ही यशोगाथा तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल..

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा – देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक. उत्तीर्ण होण्यासाठी अनेक वर्षे कठोर परिश्रम घ्यावे लागतात. या व्यतिरिक्त, चिकाटी आणि संयम कधीही न सोडण्याची वृत्ती यश मिळवून देते. आज आम्ही तुमच्यासाठी दृष्टिहीन विद्यार्थिनी प्रांजल पाटीलची कहाणी घेऊन आलो आहोत, जी आपल्या सर्व अडचणींवर मात करून भारताची पहिली अंध महिला IAS अधिकारी बनली.

आयुष्यात काहीतरी करुन दाखवण्याच्या जिद्दीतून त्यांनी एक-एक अडथळे पार केला. प्रांजल पाटील यांनी दोनदा UPSC परीक्षा दिली. एकदा 2016 मध्ये आणि एकदा 2017 मध्ये. 2016 मध्ये त्याची रँक 744 होती, पण दुसऱ्या प्रयत्नात तिने 124 वा रँक मिळवला. मूळ जळगावच्या असलेल्या प्रांजल उल्हासनगरला राहतात. त्यांची दृष्टी जन्मतःच अधू होती. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी दृष्टी कायमची गमावली. मात्र समस्यांपुढे गुडघे टेकेल, तर त्या प्रांजल पाटील कशा.

मुंबईतील कमला मेहता दादर स्कूल फॉर द ब्लाइंडमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतले आणि सेंट झेवियर्स कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी संपादन केली. त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि नंतर एम.फिल आणि पीएच.डी. चे उच्चशिक्षण पूर्ण केले.

विशेष म्हणजे प्रांजल यांनी कधीही आयएएस तयारीसाठी कोचिंग घेतले नाही. पुस्तकांचे मोठ्याने वाचन करणारे खास सॉफ्टवेअर त्यांनी वापरले. आपल्या श्रवण क्षमतेचा फायदा घेऊन तयारी केली. अंध असल्याच्या कारणावरून त्यांना भारतीय रेल्वेकडून नोकरी नाकारण्यात आली होती.

मात्र, रेल्वे मंत्रालयात आपल्या हक्कासाठी चकरा मारत असतानाच पुढच्या परीक्षेची तयारी करत लढाई जिंकली. 2017 मध्ये रँक सुधारत 124 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिव्यांगांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत नाही. तसेच ग्रंथालयातील पुस्तकांवर अनेक विद्यार्थी मार्किंग करत असल्याने, त्याचे कॉम्प्यूटरवर स्कॅन करताना आवश्यक भाग स्कॅन होत नाहीत. अशावेळी महत्त्वाचाच भाग वगळला जातो. ते बंद व्हावं यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts