PSI Success Story गावातील लेकीचे उच्च शिक्षण, कामाची कास आणि प्रशासकीय अधिकारी पर्यंतचा प्रवास हे सारं गावासाठी नवीन असलं तरी प्रेरणादायी नक्कीच आहे. सुनिता संभाजी घाडगे हिचा प्रवास देखील ग्रामीण भागातून अनेक महिलांना व मुलींना यापासून प्रेरणा मिळणार आहे. कारण, तिने मनापासून व जिद्दीने कष्ट घेतले की प्रशासकीय अधिकारी बनून यश मिळवले.
सुनीताला लहानपणापासून प्रशासकीय क्षेत्रात काम करून समाजाची सेवा करायची इच्छा होती. तिचे वडील प्रगतशील व आधुनिक शेतकरी ओळखले जातात. मूळची सांगोला तालुक्यातील वाकी गावातील सुनिता संभाजी घाडगे हिची पीएसआय पदी निवड झाली आहे. ती गावातील पहिली महिला पी.एस. आय आहे. सुनीता हिचे शालेय शिक्षण वाकी व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण बारामती येथे झाले. दहावी व बारावी मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करून तिने यश मिळवले होते. त्यानंतर अभियांत्रिकी चे शिक्षण शेळवे पंढरपूर येथे यशस्वीरित्या पूर्ण केले.
त्यानंतर तिने नोकरीच्या मागे न जाता पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे ठरवले. त्यासाठी ती दोन वर्षे शिक्षणाचे माहेरघर पुणे येथे अभ्यास करत होती.
पोलीस उपनिरीक्षक म्हटलं की मैदानी चाचणीला देखील सामोरे जावे लागते. पुण्यात राहून ती अभ्यासासह मैदानाचा देखील सराव करायची. या दोन वर्षांच्या कालावधीत तिने फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे, तिला पहिला प्रयत्नात पी.एस.आय हे पद मिळाले. तिचा हा प्रवास कित्येक ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे.