⁠  ⁠

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत अंगाववाडीच्या 818 पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Pune Anganwadi Recruitment 2023 : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत “अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका” पदांसाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण 818 रिक्त जागा आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : 818

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

01) अंगवाडी सेविका /मिनी अंगणवाडी सेविका: 165 पदे
शैक्षणिक पात्रता : 12वी पास

02) मदतनीस : 653 पदे
शैक्षणिक पात्रता :
12वी पास

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)
परीक्षा फी : फी नाही
पगार :
अंगवाडी सेविका : Rs 8325/- (अंगणवाडी विधार्थी संख्या पाहून पगार मिळेल )
मदतनीस : Rs 4425/- (अंगणवाडी विधार्थी संख्या पाहून पगार मिळेल )

सोबत जोडावयाच्या सहपत्रांची यादी :-
स्थानिक रहिवाशी असलेबाबत स्वयंघोषणापत्र व ग्रामसेवक यांचेकडील रहिवासी दाखला.
अपत्यावावत (लहान कुटुंब) असलेबाबत स्वयंघोषणापत्र दाखला
नांवा बावत प्रतिज्ञापत्र (मा. तहसिलदार सो यांचे कडील) साक्षांकित प्रत
शाळा सोडलेचा दाखला/प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत.)
उमेदवार आरक्षण प्रवर्गातील असलेस मा. उपविभागीय अधिकारी सो. यांचेकडील जातीचा दाखला. (साक्षांकित प्रत ) (अ.जा./अ.ज./वि.भ.जा/भ. ज. / इ.मा.व./वि.मा.प्र./आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/विशेष मागास प्रवर्ग)
आधार कार्ड, (साक्षांकित प्रत)
रेशनिंग कार्ड, (साक्षांकित प्रत)
विधवा असलेस पतीच्या मृत्युचा दाखला व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे स्वाक्षरीचा दाखला / अनाथ असलेस संबंधित संस्थेचा दाखला.
नियमित अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मिनी सेविका / मदतनीस म्हणुन कमीत कमी 02 वर्षांचा अनुभव असल्यास वालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडील अनुभवाचा दाखला. या प्रयोजनासाठी खाजगी संस्थेतील सेवा अनुभव ग्राहय धरणेत येणार नाही. अशी खाजगी संस्था मान्यताप्राप्त अथवा अनुदानित संस्था असली तरीही अशा संस्थांमधील अनुभव गुणांकनासाठी ग्राहय धरणेत येणार नाही.

अर्ज करणे बाबत सर्वसाधारण सुचना :-
अर्जदाराने अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा.
सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांच्या व दाखला यांच्या छायांकित प्रति (झेरॉक्स) A-4 साईज मध्येच असाव्यात A 4 पेक्षा लहान अथवा मोठया पेपर वरील असु नयेत.
ज्या मुददया बाबत माहिती लिहावयाची नसेल तेथे रेषा मारावी. माहिती कोरी ठेवण्यात येवु नये.
अंगणवाडी सेविका / मदतनीस /मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करावयाचा आहे. त्या पदाचा अर्जावर स्पष्ट उल्लेख असावा.
अंगणवाडी सेविका / मदतनीस /मिनी अंगणवाडी सेविका या दोन्ही पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास दोन्ही पदांसाठी स्वतंत्र अर्ज करणेत यावेत.
खाडाखोड किंवा चुकिचे भरलेले अर्ज बाद केले जातील याबाबत संबंधित अर्जदारांस कोणतीही पुर्व सुचना कार्यालयामार्फत दिली जाणार नाही.
अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या क्रमांकावर (४) अशी खुण करावी.
ज्या मुळ प्रमाणपत्रांची कार्यालयाने मागणी केलेली नाही परंतु अशी कागदपत्रे अर्जासोबत जोडल्यास कार्यालय त्याची जबाबदारी घेणार नाही.
अर्जासोबत जोडलेल्या साक्षांकित प्रति, किंवा अन्य कागदपत्रे कोणत्याही परिस्थीतीत उमेदवारांस परत केली जाणार नाहीत. 10. अर्जासोबत जोडलेली कोणतीही कागदपत्रे अथवा प्रमाणपत्रे नंतर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर खोटी, बनावट, खाडाखोड केलेली, अवैध, संबधित शासन आदेश / नियमानुसार जारी न केलेली अथवा सक्षम अधिकाऱ्याने प्रदान न केलेली असल्याचे आढळुन आल्यास प्रकल्प कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या निवडीपासुन उमेदवारास कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्यात येईल. शिवाय उमेदवाराची शिफारस झाली असल्यास ती पुर्वलक्षी प्रभावाने रदद करणेत येईल. तसेच इतरही कायदे शासन नियमानुसार कारवाई करणेत येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी.
सदर भरती प्रक्रिये दरम्यान कार्यालयावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास सदर उमेदवाराचा अर्ज भरती प्रक्रियेमधुन रदद करणेत येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी.

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : लवकरच
अधिकृत संकेतस्थळ : zppune.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article